फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राज्यस्तरीय इ-पोस्टर प्रदर्शन स्पर्धा उत्साहात संपन्न

सांगोला: येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये राज्यस्तरीय  इ-पोस्टर प्रदर्शन दिनांक ४ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या राज्यस्तरीय  इ-पोस्टर प्रदर्शन स्पर्धेकरिता राज्यभरातून विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे फार्मसी पदवीकरिताचे विषय हर्बल इंडस्ट्री : प्रेझेंट स्टेटस अँड फिवचर प्रॉस्पेक्ट आणि फार्माकोव्हिजिलन्स होते. तर फार्मसी पदविका करिताचे विषय हे  फार्मासिस्ट रोल इन कोविड स्विचवेशन  आणि इफेक्टिव्हनेस ऑफ ऑनलाईन टिचिंग इन प्रोफेशनल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट होते. या स्पर्धेचे आयोजन संस्थेचे चेअरमन मा.श्री. भाऊसाहेब रुपनर,मॅनेजिंग डायरेक्टर  श्री. अमित रुपनर,संचालक श्री. दिनेश रुपनर  व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व   फार्मसीचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने यशस्वी रित्या पार पडले.

   या राज्यस्तरीय  इ-स्टर प्रदर्शन स्पर्धेकरिता पदविका शाखेमधून ७३ व पदवी शाखेमधून ११६ स्पर्धक सहभागी झाले होते. पदविका शाखेमधून प्रथम क्रमांक प्रगती विष्णू शेळके राजाराम बापू कॉलेज ऑफ फार्मसी, कासेगाव इस्लामपूर, द्वितीय क्रमांक सुप्रिया आप्पासो काशीद फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी सांगोला तर पदवी शाखेतून प्रथम क्रमांक आकांशा बाळासाहेब शिंदे स्वेरी कॉलेज ऑफ फार्मसी  पंढरपूर, द्वितीय क्रमांक पूजा खर्जुले लोकमान्य टिळक इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी,खारघर नवी मुंबई या विद्यार्थिनींनी पटकावला. प्रथम क्रमांकासाठी प्रत्येकी दोन हजार तर द्वितीय क्रमांकासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले.याबरोबरच सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले.या कार्यक्रमाचे सहसंयोजक म्हणून प्रा. अमोल पोरे तर समन्वयक म्हणून  प्रा. सर्फराज काझी यांनी काम पहिले. या कार्यक्रमासाठी सर्व  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago