ताज्याघडामोडी

वीजपुरवठा बंद,गोठ्यातील जनावरांसाठी पाणी आणण्यासाठी पतिपत्नी शेततळ्यावर गेले

वीज नव्हती म्हणून जनावरांसाठी पिण्याचे पाणी आणण्यासाठी शेततळ्यावर गेलेल्या तरुण जोडप्याचा तळ्यात बुडून मृत्यू झाला आहे.

कोपरगाव तालुक्यातील आंचलगावमध्ये ही दुर्दैवी घटना घडली. पूजा निलेश शिंदे (वय २२) आणि नीलेश रावसाहेब शिंदे (वय २७) अशी त्यांची नावे आहेत. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता.

यासंबंधी माहिती अशी, मंगळवारी सायंकाळी आचलगाव परिसरात वीज नव्हती. त्यामुळे पंप सुरू करून जनावरांच्या पाण्याची व्यवस्था करणे शक्य नव्हते. सायंकाळपर्यंत प्रतीक्षा करूनही वीज न आल्याने पूजा व नीलेश शिंदे यांनी आपल्या शेतातील तळ्यातून पाणी आणण्याचा निर्णय घेताला.

त्यासाठी दोघेही तळ्यावर गेले. शेततळ्याला प्लास्टिकचा कागद असतो. पाणी काढताना ते घसरून आत पडले असावेत. बराच काळ झाला, ते परत न आल्याने शोधाशोध सुरू झाली.

याची माहिती मिळताच कोपरगाव ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. शेततळ्यातील पाणी कमी करून ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेऊन दोघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

17 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago