कुटूंबासह बेपत्ता झालेले महावितरणचे अभियंता गणेश वगरे कर्नाटकात सापडले

एका संघटनेचा पदाधिकारी व दोन पत्रकार त्रास देत असल्याने पत्नी व दोन मी मुलीसह आत्महत्या करीत असल्याची सुसाईड नोट सोशल मीडियावर पोस्ट करून दोन दिवसापूर्वी महावितरणचे सह अभियंता गणेश वगरे हे पत्नी व दोन मुलीसह गायब झाले होते.त्यांचे शेवटचे लोकेशन सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथे दाखिवले गेले होते.ते मिसींग असल्याबाबत पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.गणेश वगरे यांचा शोध घेण्यासाठी ग्रामीण पोलीस ठाण्याने तत्परतेने दोन पोलीस पथके रवाना केल्याची माहितीही सह.पोलीस निरीक्षक प्रेमकुमार केदार यांनी काल दिली होती.
  आता ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिलेल्या माहिती नुसार सदर बेपत्ता झालेले गणेश वगरे हे पत्नी व दोन मुलीसह कर्नाटकात आढळून आले असून पोलीस पथक त्यांचे समुपदेशन व मनपरिवर्तन करून पंढरपूरकडे रवाना झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
        आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत व जाणीव पूर्वक ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने करण्यात येत आहेत तसेच माझ्या विरोधात करण्यात आलेल्या तक्रारीची चौकशी करत वरिष्ठानी या तक्रारीत तथ्य नसल्याची क्लीन चिट दिली आहे असे महावितरणचे अभियंता गणेश वगरे यांनी सुसाईड नोट मध्ये म्हटले होते.तर गणेश वगरे यांनी आत्महत्या करण्याचा मार्ग निवडण्या ऐवजी जर ते निर्दोष असतील तर त्यांनी पोलिसात धाव घेतली पाहिजे होती अशी चर्चाही होऊ लागली होती.
    आता गणेश वगरे हे पत्नी व दोन मुलीसह सहीसलामत सापडले असून पोलीस पथक त्यांना घेऊन पंढरपूरकडे येत आहेत.आता गणेश वगरे हे सुसाईड नोट मध्ये नमूद केलेल्या छळवणुकीबाबत पोलिसांसमोर काय स्पष्टीकरण देतात हे आता पहावे लागेल. 
     
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago