खा.अमोल कोल्हेनी केलेले कौतुक वाया गेले, लाखोंची हंडी अखेर फुटलीच !

‘प्रोटेक्टर’ अडचणीत येणार ?

६ महिन्यात दुप्पट करून देतो या नावाखाली एका मॅकेनिकची फसवणूक केल्या प्रकरणी प्रथमेश कट्टे व शुभम कोरके यांच्या विरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि ३५,४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला प्रथमेश कट्टे हा या बनवाबनवी प्रकरणातील प्रमुख आरोपी असून मागील जवळपास दीड वर्षांपासून ‘संकल्प’ची हंडी फुटणार अशी चर्चा होताना दिसून आली.अनेक ठेवीदार,गुंतवणूकदार प्रथमेश कट्टेच्या भरमसाठ व्याज दराच्या अमिषाला व शेअर मार्केट मनी मेकिंग च्या भुलथापाला बळी पडले असल्याचीही चर्चा होत आली.मात्र बहुतांश गुंतवणूकदार आणि लखपती बनविण्याचा संकल्प सिद्धीस नेण्याचे आश्वासन देणारा यांच्यात कायम एखादया मध्यस्थाचा दुवा ठेवण्यात आल्याचेही बोलले जाते.त्यामुळे अनेक गुंतवणूकदार हे गेल्या दीड वर्षांपासून मध्यस्थांच्या मागे हात धुवून लागल्याचीही चर्चा होताना दिसून आली.   

राजेशाही थाट,लाखोंचा खर्च करून सिने कलावंतीण स्टेजवर आणि समोर तरुणाईचा जल्लोष व लाखोंच्या बक्षिसाची दहीहंडी असल्या कार्यक्रमाचा फंडा वापरत सुरुवातीच्या काळात ‘गुंतवणूक दारांवर छाप पाडण्याचा संकल्प सोडण्यात आला खरा परंतु मागील दोन वर्षांपासून पितळ उघडं पडतंय हे लक्षात येताच कट्टे हा अज्ञातवासात गेल्याची चर्चा सुरु झाली.   

याच दरम्यान काही संचालकांना साऱ्या परिस्थितीचा अंदाज आल्याने काहींनी थेट कट्टेकडे तर काहींनी थेट सोलापूर सहकार निबंधक कार्यालयात जाऊन संचालक पदाचे राजीनामे सादर केल्याचेही समजते.आता दाखल झालेला ४२० चा गुन्हा हे हिमनगाचे टोक असून केवळ ज्यांच्या मध्यस्थीने गुंतवणूक केली ते मध्यस्थ लवकरच आपले पैसे मिळतील असे आश्वासन देत आल्यानेच अनेक गुतवणूकदारांनी दोन वर्षपासून कळ काढली होती.आता पोलिसांनी तक्रारी दाखल करण्याचे आवाहन केल्या नंतर गुंतवणूकदार पुढे येणार का हेही पहावे लागेल.   मात्र याच कालावधीत काहींनी ‘संकल्प’ला प्रोटेक्शन दिल्याने सामान्य गुंतवणूकदार हतबल ठरले आहेत,आणि या प्रोटेक्टर मंडळींचा मोठा दबदबा असल्याने हे गुंतवणूकदार तक्रारही करण्यास धजावत नव्हते या चर्चेला पहिली तक्रार दाखल झाल्याने स्वल्प विराम मिळाला आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

5 mins ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago