गुन्हे विश्व

तरुणींची छेड काढली म्हणून जाब विचारताच मुख्याध्यापक, हॉस्टेल अधीक्षकांवर तलवार हल्ला !

मुलींची छेड काढू नये असे समजावून सांगणाऱ्या मुख्याध्यापक व वसतिगृह अधिक्षकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड शहराजवळ घडली.

कन्नड शहरा जवळील साखर कारखान्यासमोर आसलेल्या कर्मवीर काकासाहेब महाविद्यालयात ही खळबळजनक घटना आज घडली. या घडनेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुजीब जमील शेख असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मुजीब जमील शेख हा मक्रणपूर येथील रहिवासी आहे. मुजीब जमील शेख हा युवक शाळा सुटली की दररोज शाळेबाहेर येवून मुलींची छेड काढत असे. यासंदर्भात मुलींनी हा प्रकार मुख्याध्यापक ए पी चव्हाण यांना सांगितला.

दरम्यान, शाळा सुटल्यावर मुजीब जमील शेख हा युवक तेथे दिसल्याने मुख्याध्यापक चव्हाण यांनी त्याला जाब विचारला. दररोज या परिसरात कशाला येतो, असा जाब मुख्याध्यापक यांनी मुजीब जमील शेख याला विचारला. याचा राग आल्याने मुजीब जमील शेख याने तलवारीने मुख्याद्यावक चव्हाण यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवला.

मुजीब जमील शेख याने केलेल्या तलवारीचा हल्ला मुख्याद्यापक चव्हाण यांनी चुकवला, मात्र तलवारीचा हा वार मुख्याध्यापक चव्हाण यांच्या खांद्याला व कानावर बसला. त्यामुळे मुख्याध्यापक चव्हाण यांच्या खांद्याला व कानाला गंभीर जखम झाली. दरम्यान ही घटना समजताच वसतिगृह अधिक्षक संतोष जाधव हे मुख्याद्यापक चव्हाण यांच्या मदतीला धावले.

याशिवाय अन्य शिक्षक वर्ग मदतीला धावल्याने मुजीब जमील शेख हा घटनास्थळावरून पसार झाला. शिक्षकानी जखमी मुख्याध्यापक व सहकारी यांना रुग्णालायात दाखल केले.

या घटनेमुळे मराठवाड्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago