Categories: Uncategorized

वडाळ्यातील राष्ट्रवादीच्या बैठकीत काकांनी सांगितले सभासद वाढवा

सभासद नोंदणी पुस्तके घेऊन पदाधिकारी परतले

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आजच्या वडाळा, माऊली महाविद्यालय येथील तातडीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीची वाटचाल आणि आगामी नगर पालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका लक्षात घेत पक्षांतर्गत सुरु असलेली टोकाची गटबाजी आणि मोहोळ व पंढरपूर तालुक्यात या गटबाजीमुळे निर्माण झालेली परिस्थिती यावर काही तरी खडे बोल सुनावत गटबाजीला पूर्ण विराम देण्यासाठी ठोस उपाय योजना करणार अशी चर्चा मागील २ दिवसापासून होताना दिसून आली.

 

मात्र आज वडाळा झालेल्या बैठकीत पक्षांतर्गत टोकाच्या गटबाजीवर जिल्ह्यातील सर्वच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मौन बाळगत सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी कॉग्रेस बळकट करण्यासाठी क्रियाशील सभासद वाढवा असे सांगत उपस्थित पदाधिकाऱ्यांना सभासद नोंदणीचे पुस्तके देऊन मोलाचे चार शब्द सांगत परत पाठवले आहे असेच म्हणावे लागेल.

 

तातडीच्या बैठकीत जिल्हाध्यक्ष श्री.बळीराम काका साठे यांनी बहुमोल मार्गदर्शन करत सभासद नोंदणी संदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या.आजच्या बैठकीला सुरुवातीला कार्यालयीन सरचिटणीस लतिफभाई तांबोळी यांनी आजच्या बैठीकेचे प्रयोजन सांगताना उपस्थित सर्व पदाधिकारी यांचे स्वागत केले. संघटनात्मक संरचना कशी असावी, का असावी, आपला प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी ह्याला पक्षाच्या घटनेने जो प्राथमिक अधिकार दिला आहे त्यासाठी आपण सक्रिय सभासद असणे गरजेचे असल्याचे सांगत भविष्यातील गोष्टीसाठी आणखी संघटना वाढविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे लतिफभाई तांबोळी विशेष नमूद केले.
यांनतर सभासद नोंदणी पुस्तिका कशी भरायची याबाबत सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मिलिंद गोरे यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, महिला अध्यक्ष यांच्याकडे प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्येकी २०० पुस्तिका देण्यात आल्या.
आजच्या या बैठकीला पक्षाचे जनरल सेक्रेटरी ॲड.विक्रम सावळे, पंढरपूर तालुका अध्यक्ष विजयसिंह देशमुख, शहर अध्यक्ष सुधीर भोसले, सांगोला तालुका अध्यक्ष तानाजी काका पाटील, उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष प्रल्हाद काशीद, करमाळा तालुका अध्यक्ष संतोष वारे, अक्कलकोट तालुका अध्यक्ष दिलीप सिद्ध्ये, बार्शी शहर अध्यक्ष अमोल आंधळकर आदी आजी माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी डॉ.धनंजय साठे यांनी आभार प्रदर्शन केले.
यादरम्यान अल्पसंख्यांक सेल तसेच युवती संघटनेची नवनियुक्त पदाधिकारी यांना पत्र देण्यात आले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago