गुन्हे विश्व

पुण्यात सायबर क्राईम तज्ञ् पोलीस कर्मचाऱ्यांच अट्टल गुन्हेगाराच्या तोडीचे कृत्य

पिंपरी चिंचवड पोलीस दलाची मान शरमेने झुकली जाईल अशी एक घटना उघडकीस आली आहे. शेकडो कोटींचे क्रिप्टोकरन्सी बाळगणाऱ्या एका व्यापाऱ्याच अपहरण करून त्याच्याकडून खंडणी उकळल्या प्रकरणी चक्क एका पोलीस कर्मचाऱ्याला अटक करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात त्याच्या इतर आठ साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप तुकाराम खंदारे अस आरोपी पोलीस शिपायांच नाव असून त्याने 300 कोटीं रुपयांची क्रिप्टो करन्सी मिळेल या लालसेपोटी हे कृत्य केलं. दिलीप खंदारे याने आपला मित्र प्रदीप काशीनाथ काटे याच्यासह कट रचून विनय सुंदरराव नाईक नावाच्या व्यक्तीचे अपहरण केलं होत.

दिलीप खंदारे हा पूर्वी पुणे सायबर पोलीस शाखेत कार्यरत होता. त्यावेळी त्याने ऑफिस ऑटोमेशन, सायबर गुन्हे प्रणाली, ॲडव्हान्स सायबर क्राईम इन्व्हेस्टिगेशन टेक्नॉलॉजी, बेसिक कॉम्प्युटर हार्डवेअर अँड टेक्नॉलॉजी आणि मोबाइल फॉरेन्सिक सारखे अद्यावत कोर्स केले होते. त्याच दरम्यान त्याला विनय सुंदरराव नावाच्या व्यक्तीकडे 300 कोटींचे बिटकॉईन म्हणजेच क्रिप्टो करन्सी असल्याच त्याला माहित झालं होतं.

…अन् आरोपींनी व्यापाऱ्याची केली सुटका

काही दिवसानंतर त्याची बदली झाली आणि तो पिंपरी चिंचवड पोलीस दलात कार्यरत झाला. तेव्हा त्याने आपल्या इतर सहा सात मित्रांच्या मदतीने विनय नाईक या तरुणांचा ताथवडे येथील समाधान हॉटेल जवळ अपहरण केलं. अपहरण केल्या नंतर दिलीप खंदारे याने विनय सुंदरराव याला अलिबाग येथे डांबून ठेवलं. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याचं समताच अपहरण केलेल्या विनय याला त्यांनी पुन्हा वाकड परिसरात सोडून दिलं.

पोलीस कर्मचाऱ्यासह 8 जणांना बेड्या

तेव्हाच, त्यांचं अपहरण हे 300 कोटींच्या क्रिप्टोकरन्सी आणि 8 लाखांच्या खंडणीसाठी झाल्याचं वाकड पोलीस स्टेशनचे विरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांच्या लक्षात आलं. त्यांनी सखोल तपास करत आरोपी पोलीस कर्मचारी दिलीप खंदारे आणि त्याचे साथीदार सुनील राम शिंदे, वसंत श्यामराव चव्हाण, फ्रान्सिस टीमिटो डिसुझा, मयूर महेंद्र शिरके, प्रदीप काशीनाथ काटे, शिरीष चंद्रकांत खोत आणि संजय उर्फ निकी राजेश बन्सल, यांना अटक केली.

गुन्हेगारांना गुप्त माहिती पुरवल्या प्रकरणी या आधीही पिंपरी चिंचवड पोलीस दलातील एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आलं होतं. तर स्त्री अत्याचारासारखा गंभीर गुन्हा न दाखल करण्यासाठी आणि इतर प्रकरणात गुन्हे दाखल न करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचारी रंगेहात पकडले गेले होते. त्यातच हा प्रकार उघडकीस आल्याने पिंपरी चिंचवड पोलिस दलाची सर्वत्र नाचक्की होतेय.

आरोपी पोलीस कर्मचारी खंदारेच कृत्य घटनेचा अवमान करणार असून ही बाब निंदनीय असल्याने चुकीला माफी नाही या न्यायाने खंदारे विरुद्ध अत्यंत कठोर गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago