ताज्याघडामोडी

प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्न केलं; पण विवाहानंतर 18 दिवसातच नवरीने दाखवला खरा रंग

एक लग्नाची एक अतिशय अजब घटना समोर आली आहे. या घटनेत घरातील सामान घेऊन फरार झालेल्या नवरीबाईसह एका महिला दलालाला राजस्थानच्या जालोर पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी सांगितलं की, भीनमाळच्या माघ कॉलनीत राहणारा अभिषेक उर्फ ​​धरमचंद जैन याने सीता गुप्ता नावाच्या महिलेशी पूर्ण रितीरिवाजाने लग्न केलं होतं. स्वरूपगंजमध्ये राहणाऱ्या मनीषा सेनच्या मध्यस्तरीनंतर हा विवाह झाला होता.

लग्नापूर्वी मनीषाने सांगितलं होतं की, सीता ही एक साधी घरगुती मुलगी आहे आणि ती एका चांगल्या मुलाच्या शोधात आहे. शेजारी राहणाऱ्या तरुणाचं शरमेनं मान खाली घालवणारं कृत्य यानंतर अभिषेक आणि सीता यांची भेट होऊ लागली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले.

त्यानंतर 03 जानेवारी 2022 रोजी दोघांनी लग्न केलं. मात्र 21 जानेवारी रोजी घरातील कपाटात ठेवलेले 1 लाख 45 हजार रुपये आणि 5 तोळे सोन्याचे दागिने घेऊन सीता फरार झाली. सासरच्यांनी वधूचा शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. यानंतर घरातील वॉर्डरोब तपासण्यात आला.

ज्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब होती. त्यानंतर लगेचच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. नवरीला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी लक्ष्मण सिंह चंपावत यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आलं. फोनवर पाळत ठेवून महिला दलाल मनीषा सेन हिला प्रथम अटक करण्यात आली आणि तिची कडक चौकशी करण्यात आली.

ज्यात तिने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर पोलिसांनी चोरीचा माल घेऊन पळून गेलेल्या नववधूला पकडण्यासाठी सापळा रचून तिलाही लवकरच अटक केली. मोठ्या भावाच्या अनुपस्थित छोट्याचे वहिनीसोबत संबंध; खुलासा होताच जिवानिशी गेला! पोलिसांनी नवरीकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

वधू उत्तर प्रदेशातील असल्याचं सांगितलं जात आहे. तिच्याकडे सापडलेले सोन्याचे दागिने तपासण्यात येत आहेत. आता या महिलेनं अशा पद्धतीने किती लोकांची फसवणूक केली आहे, याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago