ताज्याघडामोडी

आता मिळणार 30 दिवसांची रिचार्ज व्हॅलिडीटी, ट्रायचे टेलिकॉम कंपन्यांना आदेश

टेलिकॉम रेग्यूलेटरी अॅथॉरिटी ऑफ इंडियाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून यामुळे फोन वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा फायदा होणार आहे. ट्रायने Telecom Tariff Order, 2022 अंतर्गत घेतलेले नवीन निर्णय घेतले असून दूरसंचार कंपन्यांना आदेशही जारी केले आहेत. 

या आदेशानुसार आता टेलिकॉम कंपन्यांना 28 नाही तर 30 दिवसांची रिचार्ज व्हॅलिडीटी ग्राहकांना द्यावी लागणार आहे.

जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांची काही दिवसांपूर्वी प्रिपेड रिचार्जच्या किंमती वाढवल्या होत्या. प्रिपेड रिचार्जमध्ये तब्बल 15 ते 20 टक्के वाढ करण्यात आली होती. यामुळे ग्राहकांनी प्रचंड नाराजगी व्यक्त केली होती. अशा स्थिथीत ट्रायने टेलिकॉम कंपन्यांना दिलेल्या नव्या आदेशामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

TRAI च्या आदेशानुसार दूरसंचार कंपनी किमान एक प्लॅन, एक स्पेशल टॅरिफ व्हाउचर आणि एक कॉम्बो व्हाउचर असे ठेवेल ज्याची वैधता एक महिन्यासाठी असणार आहे. याआधी टेलिकॉम कंपन्याकडून एका महिन्याच्या नावाखाली 28 दिवसांची वैधता असलेले प्लॅन दिले जात होते.

मात्र आता ट्रायने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार प्लॅनची ​​वैधता 28 दिवस नाही तर 30 दिवसांची असणार आहे. तसेच ग्राहकाला चालू प्लॅन पुन्हा रिचार्ज करायचा असेल तर तो सध्याच्या प्लॅनच्या तारखेपासून करू शकेल अशी तरतूद असावी असेही ट्रायने आपल्या आदेशामध्ये म्हटले आहे.

ग्राहकांसाठी खुशखबर

टेलिकॉम कंपन्या एका महिन्याच्या नावाखाली 28 दिवसांचा प्लॅन देत असल्याची तक्रार ग्राहकांनी केली होती. त्यात कंपन्यांनी प्रिपेड प्लॅनच्या किंमतीही वाढवल्याने ग्राहक नाराज झाले होते. त्यामुळे ग्राहकांना दिलासा देण्यासाठी ट्रायने प्लॅनची वैधता पूर्ण 30 दिवस मिळणार आहे.

टेलिकॉम कंपन्यांची कोंडी

टेलिकॉम कंपन्या महिन्याला 2 दिवनस वाचवत होती आणि वर्षाला तब्बल 28 ते 29 दिवस कंपन्यांचा फायदा होत होता. अशा स्थितीत ग्राहकाला 12 ऐवजी 13 रिचार्ज करावे लागत होते. यामुळे कंपन्यांचा फायदा होत होता. परंतु आता ट्रायच्या निर्णयामुळे टेलिकॉम कंपन्यांची कोंडी झाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

52 mins ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago