ताज्याघडामोडी

दहावी बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) जाहीर केले आहे. माहितीनुसार, २५ फेब्रुवारी २०२२ पासून दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरु होतील आणि १४ मार्चपर्यंत चालतील.

तर, १४ फेब्रुवारी ते ३ मार्चच्या दरम्यान बारावीच्या परीक्षा होतील. तथापि, मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर याबाबत अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. अपडेट्ससाठी, तुम्ही एमएसबीएसएचएसईच्या (MSBSHSE) अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in ला भेट देऊ शकता.

दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षांचे वेळापत्रक महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार, दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहेत. तर, बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चला सुरु होणार असून ती ३० एप्रिलपर्यंत चालेल.

दहावी आणि बारावीचे जवळपास ३५ लाख विद्यार्थी महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या २०२२च्या परीक्षांना बसण्याची शक्यता आहे. या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोरोनापासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व नियम पाळले जातील, असे मंडळाकडून सांगण्यात आले आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांनाही खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago