ताज्याघडामोडी

“अफवा पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्स बंद करणार”, केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची माहिती

अफवा पसरवणाऱ्या आणि भारतविरोधी षडयंत्र करणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने खोटी माहिती पसरवणे आणि भारताविरोधी षडयंत्र केल्याचा ठपका ठेवत २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती. आता या निर्णयानंतर केंद्र सरकार अशा वेबसाइट्स आणि युट्यूबवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचा इशारा अनुराग ठाकूर यांनी दिलाय.

अनुराग ठाकूर म्हणाले, “मी खोटी माहिती पसरवणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. मला आनंद आहे की जगभरातील मोठ्या देशांनी याची दखल घेतली आहे. यु ट्यूबने देखील समोर येत अशा यु ट्यूब चॅनल्सला ब्लॉक केलंय.”

“समाजात फूट पाडणाऱ्या वेबसाइट्स-यु ट्यूब चॅनल्सवर भविष्यातही कारवाई सुरूच राहणार”

गुप्तचर संस्थांशी समन्वय करत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतविरोधी आणि खोटी माहिती पसरवण्याचा ठपका ठेवत डिसेंबर २०२१ मध्ये २० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाइट्सवर बंदी घातली होती. यातून समाजात फूट पाडणाऱ्या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर भविष्यात देखील कारवाई सुरूच राहिल, अशी माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली.

२० यु ट्यूब चॅनल्स आणि २ वेबसाईटवरील बंदीचं कारण काय?

डिसेंबरमधील कारवाईनंतर अनुराग ठाकूर म्हणाले होते, “बंदी घातलेले यु ट्यूब चॅनल्स आणि वेबसाइट्स पाकिस्तानमधून चालवले जात होते. ते भारतासंबंधी संवेदनशील विषयांवर खोटी माहिती पसरवत होते. या वेबसाइट्स आणि यु ट्यूब चॅनल्सवर काश्मीर, भारतीय सैन्य, भारतातील अल्पसंख्याक समुह, राम मंदीर, जनरल बिपीन रावत इत्यादी विषयांवर विभाजनकारी माहिती पसरवली जात होती.”

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago