पंढरपूरात गणेश महाराजांनी सांगितले,दोन नंबरचे सोने निम्म्या पैशात मिळतंय !

गळ्याला कोयते लावल्याने अंगावरील सोने,रोख रक्कम देऊन आले  

पंढरपूर तालुक्यातील वाखरी येथील तरुण एका शोरूम मध्ये काम करत असून वाखरीतीलच एकजण व अनवली हे फिर्यादीच्या परिचयाचे आहेत.काही दिवसापूर्वी फिर्यादी  यांचेसोबत पंढरपुर मध्ये असताना त्यांचे मित्र गणेश महाराज यांची भेट झाली होती.त्यावेळी गणेश महाराज नामक एका व्यक्तीने या तिघांना सांगतिले कि एका महिलेचा फोन येत आहे.दोन नंबरचे सोने निम्म्या किमतीत मिळतंय घेणार का असे विचारत असते.यावेळी सदर फिर्यादी व त्याचा सहकाऱ्यांची उत्सुकता जागी झाली आणि त्यांनी गणेश महाराज याच्याकडून सोने खरेदीची विचारणा करण्यासाठी आलेला मोबाईल नंबर घेतला. सदर क्रमांकावर फोन केला असता पलीकडून एका महिलेशी त्यांचे बोलणे झाले.फिर्यादी व त्याच्या सोबतच्या दोघांनी सोने खरेदीची तयारी दाखवली.

त्यावेळी त्यांनी  9373079434  नंबरवर फोन केला असता एका महिलेने निम्म्या किमतीत सोने देण्याची तयारी दाखविली व १२ जानेवारी रोजी करकंब नजीक येण्यास सांगितले.हे चोघेही करकंब येथे आले असता त्यांना पुढे टेंभुर्णी रस्ता येथे आडबाजूला नेण्यात आले व १ किलो सोने आहे असे सांगत काही अंगठया व दागिने दाखवण्यात आले.

या चौघांनी  सध्या तेवढे पैसे आणले नाहीत थोडेच सोने खरेदी करणार आहे असे सांगताच सोने विक्रीसाठी आलेल्यांनी अंगात लपवलेले चाकु व गुप्तीसारखे हत्यार घेवुन फिर्यादी गळयाला कोयता लावुन सगळे पैसे काढा नाहीतर खल्लास करतो अशी धमकी देत सोने खरेदीसाठी गेलेल्या चोघांच्या अंगावरील सोने आणी रोख रक्कम घेऊन पसार झाले आहेत.

या प्रकरणी करकंब पोलीस ठाण्यात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago