शिष्यवृत्ती परीक्षेत “कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर प्रशालेचे यश

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता ५वी व ८वी च्या  शिष्यवृत्ती परीक्षेत श्री पांडुरंग प्रतिष्ठान पंढरपूर संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. मागील काही वर्षांपासून असलेल्या कोरोनाच्या आणीबाणी परिस्थितीत सुद्धा या परीक्षेतील विद्यार्थ्याना शिक्षकांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले.

          या शिष्यवृत्ती  परीक्षेत प्रशालेतील एकूण ४ विद्यार्थी पत्र यादीत आले असून. इयत्ता ५ वीतील विद्यार्थी कु.मिहीर मकरंद बडवे याने ३०० पैकी २१० गुण मिळवत गुणवत्ता यादीत येवून शिष्यवृत्ती मिळवत मोहोर उमटवली. त्याबद्दल प्रशालेतर्फे त्याचा सत्कार प्राचार्या सौ.सोनाली पवार व  रजिस्ट्रार श्री गणेश वाळके यांनी करुन त्याचे मनभरून कौतुक केले. यावेळी विद्यार्थी मिहीर बडवे याचे पालक आई सौ.बडवे उपस्थित होत्या.

          संस्थेचे चेअरमन रोहन परिचारक यांनी मिहिरला त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देत अभिनंदन करून कौतुकाची थाप टाकली. तसेच या परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्या दिल्या.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago