पत्नीच्या मृत्यूचा दाखला मागितला,शिपाई म्हणाला सरपंच,ग्रामसेवक आल्यावर या !

पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पत्नीच्या मृत्यूचा दाखला मागण्यासाठी आलेल्या ग्रामस्थाने केसकरवाडी ग्राम पंचायतीचे रजिस्टर फेकून देत हातात दगड घेऊन ग्राम पंचायत कार्यालयातील कॉम्प्युटरच्या डिस्प्लेर घालून मोडतोड केल्याची फिर्याद ग्रा.प.शिपाई  सहदेव बाळु ढोबळे याने पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

या बाबत दाखल फिर्यादीनुसार सहदेव बाळु ढोबळे वय-28वर्षे व्यवसाय -नोकरी (ग्रामपंचायत शिपाई मौजे केसकरवाडी) हे दि.10/01/2022रोजी सकाळी 10.00वा.चे सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामपंचायतीचे वसुली रजिस्टर चेक करीत असताना 11.30वा.चे सुमारास गावातील इसम भारत रामचंद्र देशमुख याने कार्यालयात येऊन पत्नीचा मृत्युचा दाखला मागितला असता फिर्यादीने सध्या कार्यालयात ग्रामसेवक व सरपंच असे दोघेही उपस्थित नाहीत ते आलेनंतर आपण त्यांचेकडुन दाखला घेवुन जावा असे असता भारत रामचंद्र देशमुख याने फिर्यादीस तुला लय मस्ती आली आहे काय तु ऑफिस मधुन बाहेर ये तुला दाखवतोच असेम्हणत समोरील टेबलावरील ग्रामपंचायतीचे असलेले येणेबाकी रजिस्टर त्याने हातात घेवुन जोराने दरवाज्याचे बाहेर भिरकावुन फेकुन दिले.

हातात दगड हातात घेवुन टेबलावरील कम्प्युटरचे डिसप्लेवर मारून डिसप्लेची मोडतोड व तुला लय मस्ती आली आहे काय तु ऑफिस मधुन बाहेर ये तुला दाखवतोच असे म्हणुन धमकी दिली अशी फिर्याद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago