ताज्याघडामोडी

राज्यातील महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; मंत्री उदय सामंत यांची घोषणा

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयं १५ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं महाविद्यालयं आणि विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी यावेळी दिली. नुकतंच मुंबईतील शाळा ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनानं जाहीर केला होता.

मुंबईत दिवसागणिक रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. मुंबईत काल तब्बल १० हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे मुंबईतील इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ३० जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय याआधीच घेण्यात आला होता. त्यानंतर महाविद्यालयं देखील बंद करण्याबाबतची घोषणा केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर आज उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाविद्यालयांबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

उदय सामंत काय म्हणाले?

– राज्यातील अकृषी विद्यापीठे,अभिमत , स्वयं अर्थसहाय्यीटविद्यापीठे, तंत्रनिकेतन,शैक्षणिक संस्था 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार

– दरम्यानच्या काळात पूर्वीप्रमाणे ऑनलाईन शिक्षण सुरू राहणार

-परीक्षा ही ऑनलाईन होणार

-काही कारणास्त्व विद्यार्थी ऑनलाईन परीक्षांना उपस्थित न राहिल्यास शैक्षणिक हित लक्षात घेऊन त्यांना परीक्षेची संधी द्यावी

– प्रत्येक महाविद्यालयांना आणि विद्यापीठाला हेल्पलाईन सुरू करण्याचे निर्देश

– वसतिगृहातील विद्यार्थ्यांना पूर्वसूचना देऊन ते बंद करण्याचा निर्णय

– परदेशी विद्यार्थ्यांना वसतिगृहात काळजी घेऊन राहता येणार

-महाविद्यालयानी विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करून घेण्याच्या ही सूचना

-विद्यार्थ्यांसोबत शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी, प्राध्यापक यांच्या लसीकरण पूर्ण करून घेण्याचा सूचना

– 50 टक्के उपस्थितीत प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून ऑनलाईन अध्यापन सुरु राहणार

-हे सगळे नियम खासगी विद्यापीठे, शिक्षणसंस्था, स्वायत्त महाविद्यालयांना लागू राहणार

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago