स्वेरीत ए.आय.सी.टी.ई. च्या सहकार्याने ओरिएंटेशन सत्र संपन्न

स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ कडून ए.आय.सी.टी.ई.च्या मेंटॉर-मेंटी या उपक्रमांतर्गत नॅशनल इनोव्हेशन अँड स्टार्टअप पॉलिसी‘ या विषयावर झूम ऍप’ च्या माध्यमातून ऑनलाईन ओरिएंटेशन सत्र संपन्न झाले.

        प्रारंभी इनोव्हेशन सेलच्या स्वेरीच्या समन्वयक डॉ. विद्याराणी क्षीरसागर यांनी ओरिएंटेशन सेशन आयोजनाचा नेमका हेतू व  विस्तृत संकल्पना सांगून स्वेरीच्या स्थापनेपासून ते आजपर्यंतची दैदीप्यमान वाटचाल सांगितली. हा सेशन ए.आय.सी.टी. ई.नवी दिल्ली’, ‘इन्स्टिट्यूशन्स इनोव्हेशन कौन्सिल’ व केंद्र सरकारच्या इनोव्हेशन सेल’ व शिक्षण मंत्रालय अंतर्गत कार्यरत असणाऱ्या मेंटॉर-मेंटी या सदराखाली नियुक्त करण्यात आलेल्या डॉ. भावना अंबुडकर यांनी स्वेरीच्या प्राध्यापकांसाठी घेतला. डॉ.भावना अंबुडकर या पिंपरी (पुणे) येथील डॉ.डी.वाय. पाटील इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी या महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विभागाच्या विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी स्वेरीच्या प्राध्यापकांसाठी नॅशनल इनोव्हेशन स्टार्टअप पॉलिसी’ या विषयावर ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन करत असताना महाविद्यालयांमध्ये इनोव्हेशन परिसंस्था कशी निर्माण करावी?, विद्यार्थ्यांना स्टार्टअप करण्यासाठी कशा पद्धतीने प्रेरीत करावेयाबद्दल बहुमोल मार्गदर्शन केले.

स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली हे ओरिएंटेशन सत्र संपन्न झाले. डॉ. अंबुडकर यांनी प्राध्यापकांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली. या ओरिएंटेशन सत्रासाठी स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिष्ठाताविभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले. 

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago