कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी पार पडली पंढरपूर नगर पालिकेच्या स्थायी समितीची बैठक

पंढरपूर नगर पालिकेच्या विद्यमान नगराध्यक्षा साधना भोसले यांच्यासह सर्व नगरसेवकांचा कार्यकाळ आज रात्री १२ वाजता समाप्त होणार असून त्यानंतर नगर पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू होणार.मात्र आज मुदतपूर्तीच्या अंतिम दिवस असतानाही स्थायी समितीने आपली ‘जबाबदारी’ पार पाडली असून २४ डिसेंबर रोजी काढलेल्या स्थायी समितीच्या बैठकीच्या अजेंड्यानुसार आज नगर पालिकेत स्थायी समितीची बैठक पार पडली.   

आजच्या स्थायी समितीच्या बैठकीसमोर १) मागील सभेचा इतिवृत्तांत मंजूर करणे २) नगर पालिकेच्या विविध विभागाकडून विविध कामांसाठी आलेल्या वार्षिक निविदा व इ टेंडर विभाग प्रमुखांनी केलेल्या शिफारशी नुसार मंजूर करणे.३) मा.अध्यक्ष यांनी वेळोवेळी दिलेल्या मंजुरी  आदेशास कार्योत्तर मंजुरी देणे.४) मा.सभापती यांच्या मंजुरीने आयत्या वेळच्या ५ विषयांना मंजुरी देणे आदी विषय स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवण्यात आले होते.     

या बाबत मुख्याधिकारी अरविंद माळी यांच्याकडून अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता लेखा परीक्षक नेमुणकीच्या ठरावास मंजुरी देण्यासाठी हि बैठक बोलविण्यात आली होती अशी माहिती दिली.मात्र याच वेळी वार्षिक निविदा व इ टेंडर विभाग,आयत्या वेळचे ५ विषय कुठले होते याची माहिती विचारली असता इतर कुठला ठराव नव्हता असे त्यांनी सांगितले आहे. स्थायी समितीच्या या बैठकीस सत्ताधारी आघाडीचेच एक जेष्ठ सदस्य अनुपस्थित होते अशी चर्चा असून इतर काही सदस्यांकडून सुत्रांकरवी ‘सखोल’ माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता माहिती मिळू शकली नाही. आजच्या बैठकीत अजेंड्यावरील कोणते विषय मंजूर झाले याची सविस्तर माहिती पंढरी वार्ताकडून घेतली जात आहे.       

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago