ताज्याघडामोडी

विलीनीकरण नसेल, तर मरण द्या; 269 एसटी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना साकडे

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यासाठी सुरू असलेल्या आणि प्रदीर्घ काळ सुरू असणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात अजूनही एकी कायम आहे. राज्य सरकार आमचे म्हणणे मान्य करत नसेल, तर आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, अशी आर्त विनवणी विभागातील 269 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

64 दिवसांपासून संपावर

राज्यात गेल्या 64 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. अतिशय तुटपुंज्या पगारामुळे नोकरी करावी लागत असल्यामुळे कर्मचाऱ्यांनी टोकाचा निर्णय घेत हा संप सुरू केला. संप पुकारणाऱ्या मुख्य कर्मचारी संघटनेने माघार घेऊनही राज्यभरात ठिकठिकाणच्या बसस्थानकावर आंदोलन करणारे कर्मचारी विलीनीकरणाच्या मुद्यावर माघार घ्यायला तयार नाहीत. हे पाहता त्यांच्या व्यथा खरोखर राज्य सरकारने समजून घ्यायची गरज आहे. मात्र, फक्त नोटीसवर नोटीस आणि त्यातही पगारवाढीच्या नावाखाली केलेली किरकोळ वाढ पाहता कर्मचाऱ्यांमध्ये अजूनही संताप असल्याचे दिसत आहे. राज्य सरकार एकीकडे कारवाईची धमकी देते. दुसरीकडे मागण्या मान्य करत नाही. यामुळे कंटाळून जिल्ह्यातील 269 कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे स्वेच्छा मरणाची मागणी केली आहे. तसे पत्र जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना देण्यात आले आहे.

36 कर्मचाऱ्यांना नोटीस

गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. आता परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार बडतर्फीची कारवाई करण्यात येत आहे. त्यात जिल्ह्यातील 36 कर्मचाऱ्यांना तुम्हाला बडतर्फ करण्यात का येऊ नये, अशी विचारणा करणाऱ्या नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. या कारवाईविरोधात कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago