ताज्याघडामोडी

कोविशील्डचा तिसरा डोस ओमायक्रॉनविरूद्ध जबरदस्त पॉवरफुल

जगभरात वेगाने पसरत चाललेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या अवताराने चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. तिसरी लाट आली तर ती ओयामक्रॉनमुळेच असेल असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

या चिंतेच्या वातावरणात एक दिलासा देणारी बातमी पुढे आली आहे. ऑक्सफोर्ड विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधनात दिसून आलं आहे की अ‍ॅस्ट्राझेनेका लसीचा बूस्टर डोस घेतलेल्यांमध्ये ओमायक्रॉनविरूद्ध लढा देणाऱ्या अँटीबॉडी वेगाने वाढत आहेत. साध्या शब्दात सांगायचे झाल्यास बूस्टर डोस घेतलेल्यांना ओमायक्रॉनची लागण होण्याची शक्यता ही अत्यल्प आहे.

हिंदुस्थानसाठी ही बातमी विशेषार्थाने आनंदाची आहे, कारण आपल्या देशात 90 टक्के लोकांना अ‍ॅस्ट्राझेनेकाचीत लस देण्यात आली आहे. अ‍ॅस्ट्राझेनेका आणि सीरम इन्स्टीट्यूटने बनविलेल्या लसीचे नाव आहे कोविशील्ड असं आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाने गुरुवारी जाहीर केलं आहे की बूस्टर डोसमुळे ओमायक्रॉनपासून तगडं संरक्षण कवच मिळतंय.

ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी अ‍ॅस्ट्राझेनेकाचा बूस्टर डोस घेतलेल्या 41 जणांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी घेतले होते. या नमुन्यांची तुलना कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या रक्ताच्या नमुन्यांशी करण्यात आली. या तुलनेतून असं दिसून आलं की कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या तुलनेत कोविशील्डचा तिसरा डोस घेतलेल्यांच्या शरीरात ओमायक्रॉनविरोधी अँटीबॉडींचे प्रमाण हे खूप जास्त होतं.

या निष्कर्षानंतर संशोधकांनी आवाहन केलं आहे की बूस्टर डोस देणं गरजेचं आहे. हिंदुस्थानात अद्याप बूस्टर डोस देण्याची सुरूवात झालेली नाहीये. 80 देशांमध्ये बूस्टर डोस देण्याची सुरुवात झाली आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago