ताज्याघडामोडी

महाराष्ट्रात थंडीची लाट, 2 दिवस तापमानात होणार आणखी घट

उत्तरेकडील राज्यात शीत लहर आली असून तेथील थंड वारे हे दक्षिणेकडे येऊ लागल्याने संपूर्ण महाराष्ट्र गारठला आहे. येत्या दोन दिवसात किमान तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे.

सोमवारी सकाळी राज्यात सर्वात कमी किमान तापमान धुळे येथे ५.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले आहे. नागपूर येथे ७.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. ते सरासरीच्या तुलनेत ५.६ अंशाने घटले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील किमान तापमानात मोठी घट झाली आहे. विदर्भात अनेक ठिकाणचे किमान तापमान सिंगल डिजिट झाले असून कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणच्या तापमानात घट झाली आहे.

राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश या उत्तर भारतातील अनेक राज्यात सध्या थंडीची लाट आली आहे. राजस्थानमधील अनेक ठिकाणचे तापमान शुन्याच्या खाली गेले आहे. जम्मू काश्मीर, लडाखमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होत आहे.

उत्तरेकडील थंड वार्‍यांचा जोर वाढला असून ते आता दक्षिणेकडे येत आहे. त्यामुळे विदर्भासह संपूर्ण राज्यातील किमान तापमानात वेगाने घट झाली आहे. पुणे शहरातील तापमान उद्या १० अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रात ते ८ अंशापर्यंत घसरण्याची शक्यता आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 day ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago