ताज्याघडामोडी

घरगुती कारणातून कुऱ्हाडीने घाव घालत पत्नीची हत्या

यवतमाळच्या पुसद येथील विटाळा वार्डात घरगुती कारणातून उद्भवलेल्या वादात कुऱ्हाडीचा घाव घालून पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना घडली आहे. पत्नीचा खून करण्यात आला. रेखा नारायण खरावे (वय ३५, रा. विटाळा वार्ड) असे मृत महिलेचे नाव आहे. तर नारायण यादवराव खरावे(वय ४०, रा. विटावा वार्ड) असे आरोपी पतीचे नाव आहे.

पती-पत्नीमध्ये वाद निर्माण झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. राग अनावर झाल्याने पती नारायणे पत्नी रेखाच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पत्नी पडली असता तेथून पती यादव खरावे हा पसार झाला. सदर घटनेची माहिती नागरिकांना कळताच रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रेखाला पुसदच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला असून घटनेचा पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिनेश चंद्र शुक्ला करीत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago