ताज्याघडामोडी

राष्ट्रीय लोकअदालतीत 394 प्रकरणे निकाली 5 कोटी 99 लाख 133 रुपयांवर तडजोड

पंढरपूर दि. (12):- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुबंई यांच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समितीच्यावतीने राष्ट्रीय लोकअदालतीचे पंढरपूर येथे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 394 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये, एकूण    5 कोटी 99 लाख 10 हजार 133 रुपयांची  तडजोड झाली असल्याची माहिती तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश एम.बी. लंबे यांनी दिली.

     जिल्हा न्यायालय पंढरपूर येथे दिनांक 11 डिसेंबर 2021 रोजी या लोकअदालतीमध्ये प्रलंबीत 14 हजार 882 प्रकरणे  ठेवण्यात आली होती त्यापैकी 138 प्रकरणे निकाली काढण्यात आली. तसेच  4 हजार 624 दाखल पुर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी 256 प्रकरणे निकाली काढण्यात आली. अशी एकूण 394 प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली आहेत.  या  लोकअदालतीसाठी एकूण 6 पॅनलची व्यवस्था करण्यात आली होती. या पॅनलमध्ये जिल्हा  न्यायाधिश श्रीमती के.व्ही. बोरा, न्यायाधिश एम.आर.जाधव, न्यायाधिश एस.एच.इनामदार, न्यायाधिश श्रीमती  एस.एस.खरोशे, न्यायाधिश श्रीमती ए.एस.नलगे, न्यायाधिश एम.आर. कामत तर  विधी सेवा समितीचे अध्यक्ष म्हणून जिल्हा न्यायाधिश एम.बी लंबे यांनी काम पाहिले.

         या अदालतीमध्ये दिवाणी, फौजदारी व मोटार अपघात, कौटुंबीक वादाची न्यायप्रविष्ट प्रकरणे तसेच बँका , वित्तीय संस्था, महावितरण यांची दाखल पुर्व प्रकरणे, पंचायत समिती घरकूल प्रकरणे तसेच पंढरपूर नगरपरिषदेची दाखलपूर्व प्रकरणे  ठेवण्यात आली होती.

       यावेळी  विधिज्ञ तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष भगवान मुळे, विधिज्ञ, न्यायालयीन कर्मचारी तसेच पक्षकार उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago