ताज्याघडामोडी

SBI बँकेचे इंटरनेट बँकिंग, UPI सुविधा आज रात्रीपासून राहणार बंद

देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या 44 कोटी खातेधारकांसाठी महत्त्वाची माहिती जारी केली आहे. बँकेने ट्विट करून आपल्या ग्राहकांना सावध केले आहे आणि त्यांच्या गरजेनुसार बँकेशी संबंधित कामे अगोदरच निकाली काढण्याचे आवाहन केले आहे. बँकेने आपल्या ग्राहकांसाठी जारी केलेल्या माहितीमध्ये बँकेच्या काही महत्त्वाच्या सेवा उद्या बंद राहणार असल्याचे सांगितले आहे.

SBI इंटरनेट बँकिंग सेवा 11 डिसेंबर ते 12 डिसेंबर 2021 म्हणजेच शनिवार-रविवार रात्री 11.30 ते पहाटे 4.30 पर्यंत ग्राहकांसाठी उपलब्ध नसेल. त्यामुळे, तुम्ही 11 डिसेंबरच्या मध्यरात्रीपूर्वी तुमची ऑनलाइन बँकिंग कामे पूर्ण करुन घ्यावीत.

SBI ने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट केले आहे, “आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना विनंती करतो की, त्यांनी आमच्यासोबत राहावे कारण आम्ही एक उत्कृष्ट बँकिंग अनुभव प्रदान करण्याचा प्रयत्न करतो.

त्यात बँकेने पुढे म्हटले आहे की, “आम्ही 11 डिसेंबर 2021 रोजी दुपारी 11.30 ते पहाटे 4:30 (300 मिनिटे) तंत्रज्ञान अपग्रेडेशनचे काम करणार आहोत. INB / Yono / Yono Lite / Yono Business / UPI सह SBI च्या ऑनलाइन बँकिंग सेवा. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

19 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago