स्वेरीत ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील विद्यार्थी देखील समरस होतात हे एक भविष्याच्या दृष्टीने प्रगतीचे पाऊल- शास्त्रज्ञ डॉ. यल्लोजीराव मिरजकर

विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून उत्तम करिअर घडविण्यासाठी स्वेरी ज्या प्रकारचे शिक्षण देते ती खरोखरच उल्लेखनीय बाब आहे. राज्यातील शिक्षण संस्थांनी स्वेरीचे अनुकरण केल्यास विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाला नक्कीच अधिक गती येईल. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी म्हणून स्थापन झालेल्या स्वेरीत आज ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातील विद्यार्थी देखील समरस होतात हे एक भविष्याच्या दृष्टीने प्रगतीचे पाऊल आहे. स्वेरी कॅम्पसकडे पाहिल्यास शिक्षक वर्ग हा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने परिश्रम घेत असल्याचे दिसून येते आणि याच कारणामुळेच स्वेरीचे नाव शिक्षणक्षेत्रात अग्रक्रमाने घेतले जाते.’ असे प्रतिपादन न्यु जर्सी (युएसए) मधील शास्त्रज्ञ डॉ. यल्लोजीराव मिरजकर यांनी केले.

        गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूटपंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगला कोलगेट पामोलीव्ह कंपनीतील ग्लोबल विभागात रिसर्च अँड डेव्हलपमेंट अधिकारी म्हणून निवृत्त झालेले न्यु जर्सी (युएसए) स्थित शास्त्रज्ञ डॉ. यल्लोजीराव मिरजकर यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी शास्त्रज्ञ डॉ. मिरजकर यांनी स्वेरीतील शैक्षणिक व्यवस्था व सुविधा पाहून गौरवोद्गार काढले. प्रारंभी स्वेरीचे युवा विश्वस्त प्रा. सुरज रोंगे यांनी त्यांचे स्वागत केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे सर आणि त्यांच्या १६ अभियंत्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या स्वेरी‘ ची आजपर्यंतची यशस्वी वाटचाल,  शैक्षणिक कार्यपद्धतीस्वेरीला मिळालेली मानांकनेसंशोधनासाठी आलेला निधी आदी बाबींची माहिती संशोधन विभागाचे अधिष्ठाता डॉ. रणजित गिड्डे यांनी दिली. पुढे बोलताना शास्त्रज्ञ डॉ. मिरजकर म्हणाले की, ‘गोव्यातील एका आंतरराष्ट्रीय परिषदेच्या निमित्ताने पंढरपूरला भेट देण्याचा योग आला. यापूर्वी संशोधनाच्या प्रगतीमुळे आणि शिक्षणातील नवनवीन उपक्रमांमुळे स्वेरीचे नाव ऐकून होतोआता प्रत्यक्षात पाहता आले. स्वेरीमध्ये शिक्षक व विद्यार्थी यांची चर्चा होत असताना जवळून पाहिले. त्यावेळी विद्यार्थ्यांच्या बौद्धिक प्रगतीचा अंदाज आला. स्वेरीमध्ये आदर व संस्कार’ या बाबी ठळकपणे जाणवतात. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी केले जाणारे शिक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न व तळमळ वाखाणण्यासारखी आहे.’ यावेळी शास्त्रज्ञ डॉ. मिरजकर यांनी प्रवेश प्रक्रिया विभागवर्कशॉपसंशोधन विभागासह अन्य विभागफार्मसी महाविद्यालयाकडे असणाऱ्या हर्बल गार्डनला भेट देवून तेथील विविध प्रकारच्या आणि दुर्मिळ असणाऱ्या औषधी वनस्पतींची पाहणी करून माहिती जाणून घेतली. स्वेरी अंतर्गत असलेली चारही प्रमुख महाविद्यालयामधील प्राध्यापकांशीही संवाद साधला. यावेळी त्यांनी स्वेरीच्या संशोधन विभाग अंतर्गत असलेल्या रोपळे गावातील आकृती’ प्रकल्पाला भेट दिली. तेथे परमेश्वर माळी यांनी आकृतीच्या गरुडझेपेबाबत माहिती दिली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संगीता मिरजकर यांच्यासह डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवेप्रशासन अधिष्ठाता डॉ. मिलिंद कुलकर्णीशैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवारमेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. संदीप वांगीकरइलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ. मिनाक्षी पवारइलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या विभागप्रमुख डॉ.दीप्ती तंबोळीकॉम्प्यूटर सायन्स अँन्ड इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. सोमनाथ ठिगळेप्रा. भास्कर गायकवाडविभागप्रमुखप्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारीप्रवेश घेण्यासाठी आलेले विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

6 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago