ताज्याघडामोडी

23-24 नोव्हेंबरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा; शरद पवार, अजित पवार उपस्थित राहणार

 

सध्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीची धूम सुरु आहे. आगामी काळात पुणे, मुंबई तसेच इतर मोठ्या शहरांतील  महापालिका निवडणुका लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षबांधणीसाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी महाबळेश्वरला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हजेरी लावणार आहेत.

महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा राज्यव्यापी मेळावा आयोजित करण्यात आलाय. येत्या 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्याला शरद पवार तसेच अजित पवार उपस्थित राहणार आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात हा मेळावा महत्त्वाचा ठरणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना स्वतः अजित पवार आणि शरद पवार मार्गदर्शन करणार आहेत.

मेळाव्याला राष्ट्रवादीचे बडे मंत्री उपस्थित राहणार

या मेळाव्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्यभरातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. आगामी काळातील महापालिका निवडणुका तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसची पुढील वाटचाल यावर या दोन दिवसीय मेळाव्यात चर्चा आणि मार्गदर्शन करण्यात येईल. विशेष म्हणजे या मेळाव्याचा समारोप 24 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महत्त्वाचे मंत्रीदेखील उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान, आगामी काळातील महापालिका निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसने योजना आखायला सुरु केली आहे. शरद पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड पालिका ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या स्थानिक नेत्यांसोबतच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत.तसेच मुंबईतदेखील राष्ट्रवादी पक्षबळटीकरणासाठी पावले टाकत आहे. पुणे महापालिकेसाठी राष्ट्रवादीने खास जोर लावल्याचे दिसतेय. काहीही झालं तरी यावेळी राष्ट्रवादीचाच महापौर होणार असा दावा यापूर्वी राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी केला आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago