सांगोला: येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पस – कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन विभागातील सिमरन खतीब या विद्यार्थिनीची कॅपजेमिनी या मल्टि नॅशनल कंपनी मध्ये निवड झाली असून ३.८ लाखाचे वार्षिक पॅकेज मिळाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. शेंडगे यांनी दिली.
कॅपजेमिनी हि आयटी सेक्टर मधील मल्टिनॅशनल कंपनी असून तिचे हेड ऑफिस पॅरिस येथे आहे. शिवाय या कंपनीचा ५० पेक्षा जास्त देशात विस्तार असून हि कंपनी सॉफ्टवेअर व सर्विस पुरविण्याचे काम करते. या कंपनीमध्ये निवड प्रक्रियेसाठी क्यू स्पायडर या ट्रेनिंग संस्थे मार्फत विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिल्यामुळे त्यांचे कौशल्य सुधारण्यास मदत झाली. याचा फायदा या विद्यार्थ्यांना निवड प्रक्रियेमध्ये होत असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा.धनश्री राऊत यांनी सांगितले.
निवड झालेल्या या विद्यार्थिनीचे संस्थेचे चेअरमन . मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी अभिनंदन करून पुढील कारकीर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी संस्थेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री. अमित रुपनर, डायरेक्टर श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर बी. शेंडगे, फार्मसीचे प्राचार्य डॉ.संजय बैस, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. शरद पवार, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकॉम्म्युनिकेशन विभाग प्रमुख प्रा.धनश्री राऊत, ट्रेनिंग व प्लेसमेंट अधिकारी डॉ. साहेबगौडा संगनगौडर, पदवीचे प्लेसमेंट कॉ-ऑर्डिनेटर प्रा. शैलेश इटकलकर सर्व विभागांचे प्लेसमेंट कॉ-ओर्डीनेटर, सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक आदी उपस्थित होते.
माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका माढा लोकसभा…
तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…
लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…
राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…
आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…
सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली मागील काही महिन्यात राज्यात भाजप ४५…