ताज्याघडामोडी

पत्नीचा पाठलाग करत भररस्त्यात केले सपासप वार; थरारक घटना!

पत्नी आपल्याशी बोलत नाही, या कारणातून एका तरुणाने आपल्या पत्नीची भररस्त्यात निर्घृण हत्या केली आहे. आरोपीनं पत्नीचा पाठलाग करत तिला, भररस्त्यात अडवलं, तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिने बोलण्यास नकार दिल्याच्या रागातून आरोपीनं पीडितेवर धारदार चाकूने सपासप वार केले आहेत.

हा हल्ला इतका भयंकर होता की यामध्ये 21 वर्षीय पत्नी घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. यातच तिचा  दुर्दैवी अंत झाला आहे. या प्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

आकांक्षा अक्षय आठवले असं हत्या झालेल्या 21 वर्षीय महिलेचं नाव आहे. संबंधित घटना मुंबईतील चेंबूर परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मृत आकांक्षा हिच 2019 साली आरोपी अक्षयसोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही दिवस आनंदात गेल्यानंतर, अक्षयचा आलकांक्षा सोबत सतत वाद होऊ लागला. याच रागातून आकांक्षा गेल्या काही महिन्यांपासून पतीपासून वेगळं आपल्या घरी राहु लागली. दरम्यानच्या काळात अक्षयने तिच्याशी अनेकदा बोलण्याचा प्रयत्न केला.

पण आकांक्षाने त्याला कोणताही प्रतिसाद दिला नाही. बुधवारी सकाळी आकांक्षा नेहमीप्रमाणे रिक्षाने आपल्या कामावर जात होती. यावेळी आरोपी अक्षय या रिक्षाचा पाठलाग करत होता. रिक्षा राहुलनगर परिसरात आल्यानंतर आरोपीनं रिक्षाला अडवलं आणि पत्नी आकांक्षाशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण यावेळीही आकांक्षाने पती अक्षयशी बोलण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या अक्षयने आपल्याजवळी धारदार चाकुने आकांक्षावर सपासप वार केले.

हा हल्ला इतका भयंकर होती की, या घटनेच आकांक्षा जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत काही स्थानिकांनी तिला त्वरित सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण याठिकाणी डॉक्टरांनी उपचारपूर्वीच आकांक्षाला मृत घोषित केलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती अक्षयविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास आरसीएफ पोलीस करत आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

1 day ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago