गुन्हे विश्व

धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्यावर मोठा हल्ला, एअरपोर्टवरील व्हिडीओ व्हायरल

एका सुपरस्टार अभिनेत्यासोबत आज एक विचित्र आणि जिवघेणा प्रकार घडला आहे. हा अभिनेता आणि त्याची संपू्र्ण टीम  जेव्हा बंगळूर विमानतळावर पोहोचले, तेव्हा एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालं नसलं, तरी इतका कडेकोट बंदोबस्त असताना देखील असा हल्ला केल्याने लोकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा हल्ला तमिळ अभिनेता विजय सेतुपतीवर झाला आहे.

हल्लेखोर धावत आला

‘आयएएनएस’ या वृत्तसंस्थेशी बोलताना अभिनेत्याच्या जवळच्या सहाय्यकाने ही घटना बुधवारी घडल्याचे सांगितले. वृत्तानुसार, विजय सेतुपती विमानतळावर उपस्थित होते, तेव्हा एका अज्ञात व्यक्तीने मागून धावत येऊन अभिनेत्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये विजय सेतुपती विमानतळातून बाहेर पडताना दिसत आहेत, तर हल्लेखोर मागून त्याच्याकडे धावताना दिसत आहेत.

तो माणूस दारूच्या नशेत होता

एजन्सीच्या अहवालात असे म्हटले आहे की, अज्ञात हल्लेखोर मद्यधुंद अवस्थेत होता आणि विमानतळावर उपद्रव निर्माण करत होता. घटनेनंतर लगेचच सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हल्लेखोराला पकडले. यादरम्यान दोन्ही बाजूंमध्ये किरकोळ वादावादीही झाली.

या घटनेने राष्ट्रीय पुरस्कार विजेते विजय सेतुपती दुखावले आहेत. मात्र, या हल्ल्याचे कोणतेही ठोस कारण अद्याप समोर आलेले नाही.

एका मिडीया अहवालात असे म्हटले आहे की, विजय सेतुपतीचा एक वैयक्तिक कर्मचारी विमानतळावर अभिनेत्यासाठी रस्ता मोकळा करत होता, त्यादरम्यान त्याने चुकून त्या व्यक्तीला धक्का दिला. रागाच्या भरात या अज्ञात व्यक्तीने त्यांचा पाठलाग करून संधी साधून मागून हल्ला केला. व्हिडीओमध्ये हा माणूस विजय सेतुपतीला लाथ मारताना दिसत आहे.

सुरक्षा कर्मचार्‍यांनी अटक केल्यानंतर त्या व्यक्तीने नंतर माफी मागितली आणि त्यानंतर हे प्रकरण अशाप्रकारे मिटले, असे सांगितले जाते. विजय सेतुपती यांनी या व्यक्तीवर कोणतीही कारवाई केली नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

4 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

1 week ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

3 weeks ago