ताज्याघडामोडी

अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, वकिलांचा खुलासा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबधित कोणत्याही संपत्तीवर आयकर विभागाने टाच आणलेली नाही. तसेच अजित पवारांशी संबंधित कुठल्याही संपत्तीवर टाच किंवा नोटीस नाही, अजित पवारांच्या वकिलाने खुलासा केला आहे. 

तसेच त्यासंदर्भातील कोणतीही नोटीस अजित पवार यांना प्राप्त झालेली नाही. असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वकील  प्रशांत पाटील यांच्याकडून करण्यात आले आहे. आयकर विभागाच्या पत्राला कायदेशीर उत्तर देणार असल्याचं अजित पवारांच्या वकिलांनी सांगितलं आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुस-या मंत्र्याला आयकर विभागाने मोठा झटका दिला होता. मंगळवार उपमुख्यमंत्री अजित पवारांना आयकर विभागाने नोटीस पाठवली. अजित पवारांच्या नातेवाईकांशी संबंधित कोट्यवधींची मालमत्ता जप्त करण्यात आली. कारवाई केलेली संपत्ती ही बेकायदेशीर नाही हे 90 दिवसांत सिद्ध करा असं आयकरकडून सांगण्यात आलं होतं. तोपर्यंत ही संपत्तीची विक्रीही करू शकत नाही असा आदेश आयकरकडून देण्यात आला आहे.

कुठल्या मालमत्तांवर कारवाई झालीय

नवी दिल्लीतील 20 कोटींचा फ्लॅट

निर्मल हाऊस पार्थ पवार ऑफिसची किंमत 25 कोटी 

जरंडेश्वर शुगर फॅक्टरी जवळपास 600 कोटी

गोव्यातील रिसॉर्ट जवळपास 250 कोटी

महाराष्ट्रातील 27 वेगवेगळ्या ठिकाणी जमिनी जवळपास 500 कोटी

या सगळ्या मालमत्ता आयकरने अटॅच केल्या आहेत. असं असताना आता अजित पवारांच्या वकिलांनी मोठा खुलासा केला आहे. 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

20 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

7 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago