ताज्याघडामोडी

कर्ज घोटाळाप्रकरणी स्टेट बँकेच्या माजी अध्यक्षाला अटक

एका खासगी हॉटेलच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी एसबीआयचे माजी अध्यक्ष प्रतीप चौधरी यांना रविवारी जैसलमेर पोलिसांनी दिल्लीतील घरातून अटक केली. तर या प्रकरणातील अल्केमिस्ट एआरसी कंपनीचा आलोक धीर हा दुसरा आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. आलोक धीर, आरके कपूर, एसव्ही व्यंकटकृष्णन, ससी मेथाडिल, देवेंद्र जैन, तरुण आणि विजय किशोर सक्सेना यांच्याविरुद्ध जैसलमेरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले होते.

चौधरी यांना आज (सोमवार) जैसलमेर येथे आणण्यात येणार आहे. हे प्रकरण गोदावन समूहाच्या मालकीच्या मालमत्तेशी संबंधित आहे जिथे २०० कोटी रुपयांच्या मालमत्तांची २४ कोटी रुपयांना विकली गेली होती. कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेने ही मालमत्ता जप्त केली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जैसलमेरमध्ये बांधण्यात येत असलेल्या हॉटेलच्या बांधकामासाठी गोदावन समूहाने २००८ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून २४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. पण जेव्हा हॉटेल समूह त्याची परतफेड करू शकला नाही, तेव्हा एसबीआयने हॉटेल समुहाचे बांधकामाधीन आणि त्याचे एक चालू हॉटेल जप्त केले होते, त्याला नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट म्हणून वागणूक दिली होती.

त्यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रतीप चौधरी होते.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २००८ मध्ये गोदावन ग्रुपने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून  हॉटेल बांधण्यासाठी २४ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावेळी ग्रुपचे दुसरे हॉटेल कार्यरत होते. नंतर, जेव्हा समूह कर्जाची परतफेड करू शकला नाही, तेव्हा बँकेने, नॉन परफॉर्मिंग अॅसेट म्हणून दोन्ही हॉटेल्स जप्त केल्या. प्रतीप चौधरी तेव्हा एसबीआयचे अध्यक्ष होते.

हि हॉटेल्स अल्केमिस्ट एआरसी कंपनीला केवळ २५ कोटी रुपयांना बाजार दरापेक्षा कमी दराने विकल्या. त्यावर आक्षेप घेत हॉटेल समूहाने कोर्टाचा आसरा घेतला. २०१६ मध्ये जेव्हा नवीन कंपनीने हॉटेल्स ताब्यात घेतली तेव्हा त्यांची किंमत अंदाजे १६० रुपये होती. त्यानंतर चौधरी निवृत्तीनंतर अल्केमिस्ट एआरसी कंपनीत संचालक म्हणून रुजू झाले. सध्या मालमत्तांची किंमत २०० कोटी रुपये आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

6 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago