ताज्याघडामोडी

सदोष वीज बिलांची थकबाकी वसुली थांबवा,साखर कारखान्याच्या माध्यमातून वीजबिल वसुलीच्या निर्णयाचा फेरविचार करा

मा. ना. उद्धवजी ठाकरे साहेब
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, तथा शिवसेना पक्षप्रमुख
यांना सस्नेह जय महाराष्ट्र!

मा. ना. नितीनजी राऊत साहेब
ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य

यांना सविनय सादर .

विषय :- १) महावितरणची शेतकर्यांकडील सदोष बिलांची थकबाकी वसुली मोहीम रद्द करणेबाबत २) माढा विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांची थकबाकी वसुली साखर कारखान्यातर्फे करण्याचा साखर आयुक्तांचा आदेश रद्द करण्याबाबत

महोदय ,

गेल्या अनेक महिन्यांपासून महावितरण शेतकर्याकडे असणार्या थकबाकीबाबत वसुली करण्याचा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करत आहे महत्त्वाच्या वेळेस विद्युत पुरवठा पूर्णपणे बंद करणे व अगोदरच अडचणीत आलेल्या शेतकर्यांना अडचणीत आणने असे उद्योग महावितरणचे अधिकारी करत आहेत यांच्या या मोहिमेमुळे उलट वीजबिल भरणारे शेतकरीसुद्धा वीजबील भरत नाहीत कारण पैसे भरून सुद्धा त्यांना वीज मिळत नाही महावितरणकडे रीडिंग घेणे व रीडिंगप्रमाणे बिलाचे वाटप करणे यासाठी कुठलीही यंत्रणा नाही ऑफिसमध्ये बसून मनाला वाटेल तेवढी बिले शेतकऱ्यांच्या नावावर फीड केली जातात कित्येक महिने वापर नसणाऱ्यानासुद्धा लाखो रुपयांची बिले दिलेली आहेत.

 

महावितरणकडे रीडिंग घेण्यासाठी बिले वाटपासाठी किंवा मेंटेनन्स करण्यासाठी लागणारी कुठलीही यंत्रणा उपलब्धच नाही
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून महावितरणने शेतकर्यांना कुठल्याही सेवा सुविधा पुरवलेल्या नाहीत शेतकरी स्वखर्चाने सर्व मेंटेनन्सची कामे करून घेत आहेत महत्त्वाचे म्हणजे बेकायदेशीररीत्या वीज वापरणाऱ्या वर महावितरणचा कुठलाही अंकुश नाही उलट त्यांच्याकडून हप्ते घेतले जातात तसेच पाठीमागच्या काळामध्ये शेतकर्यांनी दिलेली थकबाकीची रोख रक्कम त्यांच्या बिलातून वजा झाली नाही अशा अनेक शेतकर्यांच्या तक्रारी आहेत त्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकरी वीजबिल भरण्यास नाखूश आहेत तसेच सध्या शेतकर्यांची वीजबिल भरण्याची आर्थिक परिस्थिती नाही अगोदरच अनेक नैसर्गिक संकटामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे आणि जर अशीच सक्तीची वसुली सुरू ठेवल्यास शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होणार आहे व त्याचा उद्रेक कुठल्याही स्वरुपात होऊ शकतो.

 

म्हणून आपणास नम्र विनंती की सदोष वीजबिलांची थकीत वसुली मोहीम पूर्णपणे रद्द करण्यात यावी त्याचप्रमाणे साखर आयुक्त पुणे यांनी महावितरणच्या थकबाकी वसुलीबाबत पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांबाबत साखर कारखान्यांमार्फत शेतकर्यांच्या थकीत वीजबिलांची वसुली करण्याचा आदेश काढलेला आहे तो रद्द करण्याचे आदेश देण्यात यावेत अन्यथा टक्केवारीमध्ये साखर कारखाने बुडवलेले साखरसम्राट कमिशनसाठी शेतकर्यांना बुडवायला मागेपुढे पाहणार नाहीत.
तरी कृपया माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा ही नम्र व आग्रहाची विनंती

कळावे आपला

संजय (बाबा) कोकाटे
शिवसेना माढा विधानसभा मतदारसंघ

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

6 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago