ताज्याघडामोडी

पुढील आठवड्यात 5 दिवस बंद राहणार बँका, तपासा सुट्ट्यांची यादी

नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसातच दिवाळी  आहे. या महिन्यातही भरपूर बँक हॉलिडे असणार आहे. साप्ताहिक सुट्ट्यांसह एकूण 17 दिवस बँका पुढच्या महिन्यात बंद राहणार आहेत. दरम्यान पुढील दोनच दिवसात सुरू होणाऱ्या नोव्हेंबर महिन्याच्या पहिला आठवडाच सुट्ट्यांनी भरलेला आहे. 2 नोव्हेंबरपासूनच काही राज्यात सुट्ट्यांना सुरुवात होत आहे. गोवर्धन पूजेची सुट्टी यादिवशी असणार आहे. या आठवड्यात गोवर्धन पूजा, दिवाळी, भाऊबीज इ. सणांमुळे बँका बंद राहणार आहेत.

नेमके तुम्ही जर सुट्टीच्या दिवशी बँकेत गेलात तर तुमच्या कामाचा खोळंबा होऊ शकतो. त्यामुळे त्याआधी कोणत्या दिवशी बँकांना सुट्ट्या आहेत हे जाणून घ्या. या बँक हॉलिडेमुळे तुमच्या बँकिंगविषयीच्या कामात अडथळा येऊ शकतो. अर्थात प्रत्येक राज्यानुसार बँकांच्या सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात. बँक हॉलिडे प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळे असतात, कारण काही सण-समारंभ असे असतात की जे ठराविक राज्यातच साजरे केले जातात.

ज्या राज्यात सुट्ट्या निश्चित करण्यात आल्या आहेत त्याठिकाणी बँकांचे कामकाज बंद राहील. त्यामुळे त्यानुसार योजना आखूनच तुम्ही बँकेमध्ये जा.

RBI ने जारी केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, तुम्ही तुमच्या बँकेशी संबंधित कामं लवकरच पूर्ण करा. नोव्हेंबर महिन्याची सुरुवात कन्नड राज्योत्सवाने होत आहे. त्यामुळे 1 नोव्हेंबर 2021 रोजी बेंगळुरू आणि इंफाळमधील बँका बंद राहतील. 7, 14, 21 आणि 28 नोव्हेंबर रोजी रविवारी असल्याने  देशभरात बँकांना सुट्टी असेल. त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला दुसरा शनिवार आणि 27 नोव्हेंबरला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत.

तपासा सुट्ट्यांची यादी

1 नोव्हेंबर – सोमवार – कन्नड राज्योत्सव – इंफाळ आणि बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

3 नोव्हेंबर – बुधवार – नरक चतुर्दशीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

4 नोव्हेंबर – गुरुवार – आगरतळा, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, भुवनेश्वर, चंदीगड, चेन्नई, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, कानपूर, कोची, मुंबई, नागपूर, लखनऊ यांसारख्या शहरांमध्ये दिवाळी आणि काली पूजनानिमित्त बँका बंद राहतील.

5 नोव्हेंबर – शुक्रवार – गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, गंगटोक, डेहराडून याठिकाणी बँका बंद राहतील.

6 नोव्हेंबर- शनिवार- भाऊबीजनिमित्त गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनऊमध्ये बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी असेल.

7 नोव्हेंबर – रविवारची सुट्टी.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

3 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

6 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago