मोटारसायकल संभाळा,पंढरपुरात पुन्हा २ मोटारसायकलची चोरी

पंढरपूर शहर परिसरात सातत्याने मोटारसायकल चोरी घटना घडत असून मागील तीन दिवसात २ मोटारसायकल चोरीस गेल्याची फिर्याद शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.पंढरपूर शहर डीबी पथकाने काही दिवसापूर्वी शहरातील मोटारसायकल चोरीचा कौशल्याने तपास करून ३१ मोटारसायकल ताब्यात घेण्याबरोबरच कर्नाटकातील एका आरोपीसह दोघांना अटक केले होते.या मोठ्या कारवाई नंतर नागिरकांमधून समाधान व्यक्त केले जात असतानाच पुन्हा मोटार सायकल चोरीच्या घटना घडू लागल्याने नागिरकांनी सार्वजनिक ठिकाणी मोटारसायकल लावताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे.
      दिनांक २१ ऑक्टोबर रोजी सुरेखा आदिनाथ भुसारे रा.मोहोळ या मुलासह पंढरपूर सत्र न्यायालयात कामानिमित्त आले असता न्यायालयाच्या आवारात त्यांनी हिरो कंपनीची काऴ्या रंगाची एच.एफ.डिलक्स आर.टी.ओ.नं MH13-CM-4665 ही गाडी पार्क केली.न्यायालयातून काम आटोपून परत आल्यानंतर त्यांना आपली दुचाकी दिसून आली नाही.दिनांक २४ ऑक्टोबर रोजी त्यांनी फिर्याद दाखल केली आहे.
तर दुसऱ्या घटनेत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे सेवानिवृत्त कर्मचारी महादेव भागवत पोळ,वय-63 वर्ष, रा.परदेशीनगर पंढरपुर,दिनांक 24/10/2021 रोजी सकाळी 09/00 वा चे सुमारास मोटार सायकल होंडा शाईन कंपनीची लाला रंगाची आर.टी.ओ.नं. MH13BM2182 घेऊन भाजीपाला खरेदी करण्यासाठी नवीपेठ पंढरपुर येथे आले होते .कबाडे अंडी विक्री केंद्र या दुकानासमोर मोटार सायकल हँण्डल लाँक करुन लावली व भाजीपाला खरेदी करण्यासाठी गेले.मात्र परत आल्यानंतर हँन्डल लाँक तोडुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने मो.सा.चोरून नेल्याची आमची खात्री झाल्याने त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago