ताज्याघडामोडी

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल आठ एकर श्रेत्रातील ऊस जळून खाक

शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत तब्बल आठ एकर श्रेत्रातील ऊस जळून खाक झाल्याची घटना कळमनुरी तालुक्यात घडली आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ऊस पिकासह ठिबक पाईपही जळून खाक झाले आहेत.

आशाबाई बाळासाहेब गाडेकर आणि गजानन बाळासाहेब गाडेकर यांचा कळमनुरी तालुक्यात आठ एकर ऊस होता. ऊस उत्पादनातून गाडेकर यांच्या कुटुंबियांना अंदाजे १२ लाख रुपयापर्यंत उत्पादन हाती येण्याची आशा होती. परंतु अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे ऊसासोबतच या शेतकरी कुटुंबाचं स्वप्नदेखील जळून खाक झालं.

विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे ऊसाला आग लागल्याचे शेतकरी गाडेकर यांच्या कुटुंबियांनी पोलिसांना दिलेल्या अर्जात म्हटलं आहे. आजुबाजूच्या शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.

या दुर्घटनेनंतर संबंधित विभागाने घटानस्थळी जाऊन पंचनामा केला आहे. या नुकसानीची नुकसानभरपाई महावितरण कंपनीने द्यावी, अशी मागणी गाडेकर कुटुंबियांनी केली आहे. तळहाताच्या फोडासारखं वर्षभर जपलेल्या पिकाची काही क्षणांत डोळ्यासमोर राखरांगोळी झाली आहे. आधी करोना, नंतर अतिवृष्टी आणि आता या नव्या संकटामुळे हे शेतकरी कुटुंब कोलमडून पडलं आहे. त्यामुळे आगामी काळात महावितरणकडून या कुटुंबाला काही आर्थिक मदत दिली जाते का, हे पाहावं लागेल.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago