ताज्याघडामोडी

बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी ५ हजार रुपये मिळणार

महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातील बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी पाच हजार रुपये देणार असल्याचे घोषणा ना. मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे. महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनाच्या वतीने  मुश्रीफ  यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासमोर बोलताना  त्यांनी हि घोषणा केली.

महाराष्ट्रातल्या बांधकाम कर्मचाऱ्यांना यापूर्वी कामगार कल्याण मंत्री असताना मोठ्या प्रमाणात सुविधा देण्याचा प्रयत्न केला होता. आत्ता देखील कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न केला जाईल. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करुन लवकरच कामगारांच्या प्रलंबित असणाऱ्या मागण्या बाबत विचार केला जाईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत निर्बंधांच्या या काळात महाराष्ट्रातील बांधकाम कामगारांना आर्थिक साह्य देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. या निर्णयानुसार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राज्यातील १३ पैकी नऊ लाख १७ हजार बांधकाम कामगारांना अर्थसाह्य करण्यात आले. यामुळे कष्टकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता,आता दिवाळीसाठी ५ हजार रुपये मिळणार असल्याने या कामगारांची दिवाळी गोड होणार आहे.  

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

20 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago