ताज्याघडामोडी

पालिका अधिकाऱ्याकडे कोट्यवधीचे घबाड; ३ फ्लॅट, ११ लाख कॅश, अर्धा किलो सोनं!

लाच प्रकरणी अटक करण्यात आलेले अहमदनगर महापालिकेचे मुख्य लेखाधिकारी प्रवीण गोपाळराव मानकर (वय ५२) यांच्याकडे कोट्यवधी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. कंत्राटदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या गुन्ह्यात लाच लुपचपत प्रतिबंधक पथकाने मानकर यांना अटक केली आहे.

न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली. उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या पथकाने आरोपीच्या पुण्यातील विश्रांतवाडी येथील घराची झडती घेतली. त्यावेळी ११ लाख, ५० हजारांची रोकड, ५४० ग्रॅम सोने, दीड किलो चांदी याशिवाय पुण्यातील तीन फ्लॅटची कागदपत्रे आढळून आली. ही संपत्ती कोठून आली, याचे समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. त्यामुळे पोलिसांनी ती जप्त केली. याप्रकरणी अधिक चौकशी सुरू आहे.

आरोपी मानकर नगरला महापालिकेत मुख्य लेखाधिकारी आहेत. कंत्राटदारांची बिले मंजूर करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आहे. दोघा कंत्राटदारांची कामांची बिले मंजूर करून त्यांना चेक दिल्याच्या बदल्यात मानकर यांनी २० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. मात्र, नंतर १५ हजार रुपये स्वीकारण्यास तयार झाले होते.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पडताळणीसाठी सापळा लावला. आरोपीने लाच स्वीकारली नसली तरी मागणी केल्याचे त्यात निष्पन्न झाल्याने २० ऑक्टोबरला तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना २२ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

आरोपीला अटक केल्यावर पथकाने उत्तम टाऊन स्केप, विश्रांतवाडी, पुणे येथील मानकर यांच्या घरी झडती घेतली. त्यामध्ये कोट्यवधींचे घबाड आढळून आले आहे. ही संपत्ती कोठून आली, याची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने पोलिसांनी ती जप्त केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधीक्षक हरिष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पुष्पा निमसे या करीत आहेत. मानकर हे नगरच्या दिल्लीगेट भागातील रहिवाशी असून सध्या पुण्यात वास्तव्यास आहेत.

कंत्राटदाराकडून केवळ पंधरा हजारांची लाच मागितल्याप्रकरणी ते सापळ्यात अडकले. असे असले तरी त्यांच्याकडे मोठी संपत्ती आढळून आल्याने महापालिकेच्या एकूण कारभाराबद्दल नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago