गुन्हे विश्व

बँकेवर भरदुपारी दरोडा; तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा ऐवज लंपास

शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मौजे पिंपरखेड इथं ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ या बँकेवर दरोडा टाकण्यात आला आहे. दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील जवळपास २ कोटी रुपये किमतीचे सोने आणि ३० ते ३५ लाख रुपयांची रोख रक्कम चोरून पोबारा केला आहे.

दुपारच्या सुमारास २५ ते ३० वयोगटातील पाच ते सहा इसम अचानकपणे शस्त्रांसह बँकेत घुसले. बँकेतील अधिकाऱ्यांवर पिस्तुल रोखत या दरोडेखोरांनी काही क्षणांतच सर्व ऐवज लुटला. बँकेवर दरोडा टाकण्यासाठी आलेले दरोडेखोर हे सिल्व्हर रंगाच्या सियाज कारमधून पळून गेले. भरदुपारी घडलेल्या घटनेनं जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

दरोडेखोर कोणत्या दिशेने गेले?

बँक दरोड्यातील आरोपी नगरच्या दिशेला पळून गेल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर शिंगवे, पारगाव, रांजणी, वळती, भागडी, थोरांदळे व इतर गावातील पोलीस पाटील यांनी सदरचा मेसेज आपापल्या गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करावा आणि अशी गाडी व संशयित व्यक्ती आढळून आल्यास तात्काळ मंचर पोलीस स्टेशनला कळवावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

7 days ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago