ताज्याघडामोडी

पंढरपुरात लेडी कंडक्टरला मारहाण

राज्य परिवहन मंडळाच्या सेवेत असलेल्या महिला कंडक्टर बीड -पंढरपूर एसटी बस घेऊन पंढरपूरकडे येत असताना आष्टी तालुका मोहोळ येथे एसटी मध्ये चढत एका महिला प्रवाशाने रोपळेचे तिकीट मागितल्या नंतर वाहक शामल नवनाथ पांचाळ यांनी या एसटी बसला रोपळे  थांबा नाही तुम्ही पंढरपूरचे तिकीट घ्या रोपळे येथे सोडले जाईल असे सांगितले.
मात्र महिला प्रवाशाने फिर्यादी वाहक महिलेस  रोपळेचेच तिकीट पाहीजे आहे , तुम्ही का सोडु शकत नाही असे म्हणुन व एसटी चालक तसेच एसटी मध्ये बसलेल्या लोकांसमोर अरेरावीची भाषा वापरुन शीट वरुन उतरुन फिर्यादीच्या अंगावर धावून जात तुला मारते असा ओरडाओरडा करुन बघुन घेते अशी धमकी दिली. म्हणुन फिर्यादी वाहकाने तीला समजावुन सांगुन सुध्दा ती ऐकणेच्या मनस्थितीत नव्हती तु पंढरपुर एसटी स्टँन्डवर चल तुला एस टी महामंडळामध्ये नोकरी करु देणार नाही अशी धमकी दिली.
एसटी बस पंढरपुर बसस्थानकावर लावली असता तेथील एक अनोळखी स्त्री येवुन दोघीने मिळुन सदर महिला वाहकास गणवेशाला धरुन खाली ओढाओढी करु लागले.व धक्काबुक्की केली .त्यावेळेस एस टी चालक सर्जेराव गोपीनाथ चव्हाण, भागवत तुकाराम शेलकर रा.सावतामाळी चौक आंबेजोगाई जि बीड ,सज्जला प्रभाकर राऊत दोघे रा.वरपगाव ता. आंबेजोगाई जि बीड यानी पंढरपुर बसस्थानकावर सोडवासोडव केली.
त्यानंतर पंढरपुर बसस्थानकावरील कुठल्याही अधिका-याना व कर्मचा-याना माहीती न देतासदर एसटी क्रं MH20BL2925 ही गाडी डायरेक्ट पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गेटमध्ये आणुन लावण्यात आली होती असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 day ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago