ताज्याघडामोडी

शासन साखर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

शासन साखर व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी- सहकार मंत्री बाळासाहेब पाटील

पंढरपूर (दि.17):-  साखर उद्योग शेतकऱ्यांचा आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्य शासन साखर उद्योगांच्या पाठिशी ठामपणे उभे आहे. शेतकऱ्यांचे अर्थचक्र कारखानदारीवर अवलंबून असल्याने राज्यातील कुठलाही साखर कारखाना बंद राहता कामा नये ही राज्य शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आज केले.

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना लिमिटेड चंद्रभागा नगर येथील 2020- 21 च्या 22 व्या गळीत हंगामाच्या शुभारंभप्रसंगी श्री. पाटील बोलत होते. यावेळी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे, कार्यकारी संचालक झुंजार आसबे, ह भ प जयवंत महाराज बोधले, उपप्रादेशिक सहसंचालक पांडूरंग साठे, उपनिबंधक श्री.तांदळे यांच्यासह  कारखान्याचे संचालक तसेच शेतकरी सभासद उपस्थित होते.

यावेळी श्री पाटील बोलताना म्हणाले, राज्यातील जे साखर कारखाने बँकांच्या ताब्यात आहेत आणि अनेक वर्षे बंद आहेत. त्या भागातील ऊस गाळपास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. ग्रामीण उद्योगास चालना मिळण्यासाठी असे कारखाने सुरू करणे आवश्यक आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी असे सहकारी साखर कारखाने दीर्घ मुदतीने भाडे तत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

सोलापूर हा रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख आहे. उजनी धरणाच्या निर्मितीमुळे या जिल्ह्यातील उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे.  तसेच आता शेतकरीही शेतामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत असल्याने उसाच्या हेक्‍टरी उत्पादनातही वाढ झाली आहे. त्यादृष्टीने कारखान्यांनीही बदल करणे आवश्यक आहे. यासाठी साखर कारखान्यांनी साखरेची उत्पादकता वाढविण्याबरोबरच  उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता आहे. राज्यात गेल्यावर्षी 1013 लाख टन गळीत  झाले असून यावर्षी त्यामध्ये वाढ होऊन 80 ते 82 लाख टनाने गळपात भर पडणार असल्याचे सहकारमंत्री पाटील यांनी यावेळी सांगितले

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

5 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

3 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

7 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago