Categories: Uncategorized

पंढरपूर उपविभागातील ४५३ ब्रास जप्त वाळू साठ्याचा होणार लिलाव

पंढरपूर उप विभागातील जप्त केलेल्या अवैध वाळू साठ्याचा लिलाव करण्यात येणार असून, यामध्ये मोहोळ तालुक्यातील जप्त वाळू साठ्याचा लिलाव २१ ऑक्टोबर २०२१  रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय, मोहोळ तर पंढरपूर तालुक्यातील  जप्त वाळू साठ्याचा लिलाव २२ ऑक्टोबर २०२१  रोजी सकाळी ११.०० वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर  येथे आयोजित केला असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी दिली आहे.

            पंढरपूर उपविभागातील पंढरपूर व मोहोळ तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक व साठ्यावर केलेल्या कारवाईत पंढरपूर तालुक्यातील  करकंब पोलीस ठाणे आवार येथे  १७.६० ब्रास, पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे १४५.५८ ब्रास,  पंढरपूर ग्रामीण पोलीस आवार येथे  ५८.२४ ब्रास  तर पंढरपूर शहर पोलीस स्टेशन येथे ४९.९५ ब्रास  असा एकूण २७१.३७ ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. या वाळू साठ्याची शासकीय किंमत १० लाख ४ हजार ६९ रुपये इतकी आहे. तर  मोहोळ  तालुक्यातील  तहसिल कार्यालय आवारातील  वाहनामधील ९०.०४ ब्रास तसेच कामती पोलीस स्टेशन येथे ९१.६७ ब्रास असा एकूण १८१.७१   ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला आहे. या वाळू साठ्याची शासकीय किंमत ६ लाख ७२ हजार ३२७ रुपये इतकी आहे

सदर वाळू लिलावात भाग घ्यावयाचा अशा व्यक्तींनी संबंधित ठिकाणच्या वाळू  साठ्याची पाहणी करावी. तसेच मोहोळ तालुक्यातील लिलावात भाग घेण्यासाठी बुधवार दिनांक २० ऑक्टोबर २०२१ रोजी  तर पंढरपूर तालुक्यातील लिलावात भाग घेण्यासाठी गुरुवार  दिनांक २१ ऑक्टोबर २०२१ रोजी  सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत लेखी अर्ज उपविभागीय अधिकारी कार्यालय, पंढरपूर येथे सादर करावेत, असेही उपविभागीय अधिकारी गुरव यांनी सांगितले.

 सदर लिलावात भाग घेण्यासाठी २५ टक्के रक्कम रोख अथवा  डी . डी.द्वारे भरावी त्याचबरोबर अर्जाचे शुल्क रुपये दोन हजार विनापरतावा भरणे आवश्यक आहे. तसेच सर्वोत्तम बोलीची २५ टक्के रक्कम तात्काळ त्याच दिवशी शासकीय खजिन्यात चलनाद्वारे जमा करावी. तसेच बोलीच्या रक्कमेव्यतिकरक्त  गौण खनिज  निधी रक्कम १० टक्केचा धनादेश कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. बोलीची उर्वरित ७५ टक्के रक्कम शासकीय खजिन्यात सात दिवसाच्या आत भरल्यानंतर स्वतःकडील वाहनाद्वारे संबंधित ठिकाणावरून वाळू घेऊन जावी. लिलावात भाग घेणाऱ्या व्यक्तीनी अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच नमूद ठिकाणी वेळेत उपस्थित राहावे असे आवाहनही उपविभागीय अधिकारी श्री .गुरव यांनी केले आहे.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

उसने पैसे घेतलेचे कारणावरून गंभीर जखमी केलेप्रकरणी सहा जणांना अटकपुर्व जामीन मंजूर

अ‍ॅड.संदिप कागदे यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून  अटकपूर्व जामीन मंजूर उसने पैसे घेतलेचे कारणावरून बेकायदेशीर जमाव करून लाथाबुक्यांनी व लाकडी काठीने गंभीर जखमी केल्या प्रकरणी १) समाधान श्रीपती कसबे २) सुदेश निवृत्ती कसबे ३) आकाश खंडू आयवळे ४) सतीश निवृत्ती कसबे ५) राहूल दयानंद साबळे ६) सचिन खंडू आयवळे सर्व रा खडकी ता. मंगळवेढा जि. सोलापूर यांना पंढरपूर येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. लंबे साहेब यांनी अटकपुर्व जामीन मंजूर केलेला आहे. सदरील घटनेची हकीकत अशी…

6 days ago

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 weeks ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 weeks ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 weeks ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

4 weeks ago