ताज्याघडामोडी

अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त कुटुंबांना मनसेचा मदतीचा हात : दिलीप धोत्रे

पंढरपूर ( प्रतिनिधी)

अतिवृष्टी नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत आलेल्या शेतकरी कुटुंबांना व गरजवंतांना मनसेकडून मदतीचा हात देण्यात आला. सत्ताधारी व विरोधक केवळ बांधावर जाऊन घोषणा करतात. अशावेळी राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने शेतकऱ्यांना घरात जाऊन मदत करण्यात आली असल्याची माहिती मनसेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी दिली.

गेल्या काही दिवसात मराठवाड्यासह महाराष्ट्रातील बहुतांश भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक शेतकरी कुटुंबांची जीवित आणि वित्तहानी असे वेगवेगळ्या प्रकारचे नुकसान झाले. त्या नुकसानग्रस्त लोकांचे व त्यांच्या शेतीचे राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून पंचनाम्याचे आदेश झाले. तर विरोधकांकडून केवळ पाहणी झाली. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मनसेचे नेते दिलीप बाबू धोत्रे यांनी थेट शेतकऱ्यांच्या घरात जाऊन त्यांना धीर देत आर्थिक मदत करण्याची भूमिका घेतली. त्याप्रकारे त्यांना मदतही करण्यात आली.

यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील ईरला गावात आलेल्या पुरामध्ये बालाजी वसंत कांबळे हे पाण्यात वाहून गेले. त्यांच्या पश्चात त्यांना दोन लहान मुले व वृद्ध माता पिता आहेत. या संपूर्ण कुटुंबास उदरनिर्वाहासाठी धोत्रे यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली. तर भविष्यात या कुटुंबाची कुठलीही जबाबदारी घेण्यासाठी आपण सहयोग देऊ असे यावेळी आश्वस्त करण्यात आले. तर कळंब तालुक्यातील देवकी वसंत टिंगरे या महिलेचे संपूर्ण घर पावसात वाहून गेले.

बीड जिल्ह्यातील केज या ठिकाणचे जयश्री नरहरी ठोंबरे यांची बैल जोडी पुरात वाहून गेली. त्यामुळे एक प्रकारे टिंगरे आणि ठोंबरे या कुटुंबाची घडीच विस्कटून आर्थिक विवंचनेत सापडली. या दोन्ही कुटुंबाला धोत्रे यांनी आर्थिक मदत देऊ करीत. धीर देण्याचे काम केले.

कळंब तालुक्यातील वडगाव येथील पंढरीनाथ राऊत शेतकऱ्याचे तीन एकर सोयाबीन पूर्णपणे पावसाच्या पाण्यात वाहून गेले. अल्पभूधारक शेतकरी असल्याने या शेतकऱ्याला दुसरा कुठलाही आर्थिक स्त्रोत नाही. त्यामुळे राऊत यांनादेखील आर्थिक मदतीचा हात मनसेच्या माध्यमातून दिलीप धोत्रे यांनी दिला.

अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे सरकारी पातळ्यांवर पंचनामे होतील. विरोधक व सत्ताधारी नेते बांधावर जाऊन पाहणी करतील. सरकारी मदत मिळायला दीर्घकाळ लोटेल. अशा स्थितीत मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर नव्हे तर त्याच्या घरात जाऊन कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांची सुखदुःखे वाटून घेत त्यांना मदत केली आहे.

याप्रसंगी मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन ,प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, उपाध्यक्ष अशोक तावरे , जिल्हा संघटक अमरराजे कदम , बीड चे जिल्हाध्यक्ष सुमंत धस, कल्याण केदार , शेतकरी सेनेचे भागवत शिंदे, उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष राजेंद्र गपाट , सचिन दादा कांबळे , तालुकाध्यक्ष पाशा शेख , सलीम आवटी ,बाबासाहेब वाघमारे , दत्ता बोंदर ,भागवत शिंदे, रजनीकांत ढावरे ,विष्णू पाटील आदी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

5 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

1 week ago

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैशाचा पाऊस! रोज १०० कोटी रुपये; आतापर्यंत ४,६५० कोटी रुपये जप्त

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ मार्चपासून दररोज १०० कोटी रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती भारतीय…

2 weeks ago