ताज्याघडामोडी

आजादी का अमृत महोत्सवाचे’आयोजन :  पंढरपुरात रॅली

आजादी का अमृत महोत्सवाचे’आयोजन :  पंढरपुरात रॅली

                    पंढरपूर दि. (30) :- ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत  आज दिनांक 02  ऑक्टोबर  रोजी गांधी जयंती निमित्त श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथील नामदेव पायरी पासून शिवाजी चौक  पर्यंत रॅली काढण्यात आली.

             ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा न्यायाधिश  एम. बी. लंबे यांच्या मार्गदर्शनाखाली व सह-दिवाणी न्यायाधीश ए. पी. कराड यांच्या अध्यक्षतेखाली रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणी वेद पाठशाळा, पंढरपूर येथील विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी जयंती निमित्त गांधीजींचा पोशाख परिधान करून उत्स्फूर्त सहभाग घेतला. ही रॅली शिवाजी चौकामध्ये आल्यानंतर  महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.  तसेच यावेळी कायदे विषयक शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते.

                   कार्यक्रमास  न्यायाधीश श्रीमती ए.एस.नलगे, श्रीमती एस.एस.खरोशे, सहायक गटविकास अधिकारी श्री.पिसे, पंढरपूर बार असोसिएशन अध्यक्ष अॅड. भगवान मुळे, तसेच  विधिज्ञ, विधी स्वयंसेवक, अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. सदर कार्यक्रमास श्री.राजीव कटेकर, विधी स्वयंसेवक यांचे विशेष योगदान लाभले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

14 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

4 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago