ताज्याघडामोडी

ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँक राहणार बंद

बँक बंद असली की अनेकदा पैशांची चणचण भासू लागते. त्यामुळे लोकांना पैसे काढण्यासाठी पुर्णपणे एटीएमवर अवलंबून राहावं लागतं.

इतक्या मोठ्या प्रमाणात भार पडल्याने एटीएममधील पैसे संपून तुटवडा निर्माण होण्याची शक्यता अधिक असते. बँकेचे काही व्यवहार असतील तर ते लवकर उरकून घ्या कारण ऑक्टोबर महिन्यात तब्बल 21 दिवस बँकेचे कामकाज बंद असणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून दर महिन्यातील सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते. प्रत्येक राज्यानुसार सुट्ट्या वेगवेगळ्या असू शकतात.

 

 

 

 

दर महिन्याला साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त इतरही काही सुट्ट्या बँक कर्मचाऱ्यांना दिल्या जातात. प्रत्येक राज्यानुसार या सुट्ट्या वेगळ्या असतात. ऑक्टोबर 2021 मध्ये नवरात्री, दसरा तसेच इतरही सणसमारंभानिमित्त काही सुट्ट्यात आहेत. तर या व्यतिरिक्त साप्ताहिक सुट्ट्या म्हणजेच शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्याही आहेत. अशाप्रकारे एकूण 21 सुट्ट्या पुढील महिन्यात असणार आहेत. बँका कधी नेमक्या बंद असणार हे जाणून घेऊया…

तपासा सुट्ट्यांची यादी

– 1 ऑक्टोबर – गंगटोकमध्ये बँकेच्या काही कामकाजासाठी बँक बंद असणार आहे.

– 2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती (सर्व राज्ये)

– 3 ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

– 6 ऑक्टोबर – महालया अमावस्या (आगरतळा, बंगळुरू, कोलकाता)

– 7 ऑक्टोबर – मीका चोरेल होउबा (इंफाळ)

– 9 ऑक्टोबर – दुसरा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

– 10 ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

– 12 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (महा सप्तमी) / (आगरतळा, कोलकाता)

– 13 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (महा अष्टमी) / (आगरतळा, भुवनेश्वर, गंगटोक, गुवाहाटी, इंफाळ, कोलकाता, पाटणा, रांची)

– 14 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दसरा महा नवमी/आयुथा पूजा (आगरतळा, बंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, कानपूर, कोची, कोलकाता, लखनऊ, पाटणा, रांची, शिलाँग, श्रीनगर, तिरुअनंतपुरम)

– 15 ऑक्टोबर – दुर्गा पूजा/दसरा/विजया दशमी/(इंफाळ आणि शिमला वगळता सर्व बँका)

– 16 ऑक्टोबर – दुर्गा पूजा (दशैन)/ (गंगटोक)

– 17 ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

– 18 ऑक्टोबर – कटी बिहू (गुवाहाटी)

– 19 ऑक्टोबर-ईद-ए-मिलाद/ईद-ए-मिलादुन्नबी/मिलाद-ए-शेरीफ /बारावफाट/(अहमदाबाद, बेलापूर, भोपाळ, चेन्नई, डेहराडून, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, कानपूर, कोची , लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, श्रीनगर, तिरुअनंतपुरम)

– 20 ऑक्टोबर – महर्षी वाल्मिकी यांचा जन्मदिन/लक्ष्मी पूजा/ईद-ए-मिलाद (आगरतळा, बंगळुरू, चंदीगड, कोलकाता, शिमला)

– 22 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू, श्रीनगर)

– 23 ऑक्टोबर – चौथा शनिवार (साप्ताहिक सुट्टी)

– 24 ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

– 26 ऑक्टोबर – जम्मू, श्रीनगरमध्ये बँक बंद

– 31 ऑक्टोबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 hours ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

3 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

6 days ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago