ताज्याघडामोडी

शरद पवार यांना उद्योग व्यापारी विभागाचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी कार्य अहवाल केला सादर

उद्योग व व्यापार मध्ये येणाऱ्या समस्या यांची बैठक घेऊन पक्षसंघटन वाढवणे, जीएसटी संदर्भातील प्रश्न सोडवून पर्यावरण पूरक मच्छी उद्योग व व्यापार व्यवसायाला चालना देणे, तरुण वर्गांना महामंडळामार्फत इन्कम सोर्स उपलब्ध करून त्यांना रोजगाराच्या संधी देणे,

 वेबसाईट उपलब्ध करून पुणे शहर जिल्हा व्यापारात अग्रगण्य असल्याने जंबो कार्यकारणी तयार करणे बाबत आदि याविषयी माननीय श्री प्रशांत जगताप जिल्हा अध्यक्ष पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच प्रदीप गारटकर जिल्हाध्यक्ष पुणे ग्रामीण याची कार्यकारणी नुतन पदाधिकार्‍यांचे नियुक्त करून पक्ष संघटन बळकट करणे व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा प्रत्येक घरापर्यत पोहचवणे यासंदर्भात पुणे येथे उद्योग व व्यापार यांची आढावा बैठक घेण्यात आली

यावेळी बाळासाहेब सरगर, भोला सिंग वरोरा, उद्योग-व्यापार सेल पुणे माजी शहराध्यक्ष वीरेंद्र साहेब, उद्योग-व्यापार सेल पुणे शहर महेश हांडे, पंढरपूर तालुका उपाध्यक्ष कल्याण कुसुमडे व इतर पदाधिकारी उपस्थित होते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा श्री शरदचंद्रजी पवार साहेब व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तथा प्रदेशाध्यक्ष जयवंतरावजी पाटील साहेब यांची पुणे येथे भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा उद्योग व्यापारी वर्गाचा कार्य अहवाल प्रदेशाध्यक्ष माननीय नागेश फाटे यांनी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांचे उपस्थितीत सादर केला यावेळी यावेळी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन लक्ष्मण चव्हाण, संचालक दिनकर पाटील, विलास देठे, पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे अध्यक्ष सुधीर धुमाळ आदी उपस्थित होते

 यावेळी नागेश फाटे यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा खानदेश विदर्भ मराठवाडा या विभागाचा दौरा करून पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन अडचणी जाणून घेतल्या व त्यांचा कार्य अहवाल ही सादर केला तसेच पंढरपूर तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार यांच्या करता पंढरपूर तालुक्यांमध्ये एमआयडीसीची स्थापना करणेबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करून जणू काही याचा विडाच उचलल्याचे या वरून दिसत आहे.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

2 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

5 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

1 week ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

1 week ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago