मराठा सेवा संघाने समाज परिवर्तनाचे काम केले – आ.समाधान आवताडे

अ‍ॅड.पुरूषोत्तम खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा सेवा संघाने राष्ट्रमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व महापुरुषांच्या विचारानुसार नोकरदार वर्गाला एकत्र करत समाज परिवर्तनाचे काम केल्याचे प्रतिपादन आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाच्या कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार वितरण कार्यक्रमात केले.
   मराठा सेवा संघाच्या ३१ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पंढरपूर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने कोरोना काळात समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा आमदार समाधान आवताडे, सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे,संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे, तालुकाध्यक्ष नितीन जाधव यांच्या हस्ते कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुढे बोलताना आ. समाधान आवताडे यांनी मराठा सेवा संघ समाज परिवर्तनाचे काम अहोरात्र परिश्रम घेत करत असून बहूजन समाजातील मुलींनी उच्च शिक्षण घेऊन उच्चपदस्थ अधिकारी बनावे.  पंढरपूरातील जिजाऊ वसतीगृहाला आवश्यक ती मदत करू असे सांगितले.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्र तावशीचे आरोग्य अधिकारी डॉ.ज्ञानेश बाळासाहेब सुरवसे, आरोग्य सहाय्यक शिरिष घनश्याम पाटील,आरोग्य सेविका उज्ज्वला सत्यवान बागल, आरोग्यसेवक धनाजी रामचंद्र मस्के, दैनिक पंढरी भुषणचे संपादक शिवाजी मारूती शिंदे, बाभुळगावचे डॉ. लक्ष्मण गुंडीबा सुळे, दि पंढरपूर मर्चंट बॅकेचे मुख्य व्यवस्थापक सुजीत गंगाधर मोहिते, पोलीस शिपाई निलेश रमेश कांबळे, पोलीस निरीक्षक प्रशांत संजय भागवत, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सिताराम जगताप, रोपळे येथील आशा स्वयंसेविका पुजा लक्ष्मण जाधव यांना कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार व तावशीचे उपसरपंच अमोल ज्योती कुंभार यांना मराठा मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच समर्थ तनमोर या
विद्यार्थ्याचा दहावीत १०० टक्के गुण मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास आमदार समाधान आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील, संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरणराज घाडगे,मराठा सेवा संघाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष नितीन जाधव,माढा तालुकाध्यक्ष निलेश देशमुख,दिलीपराव भोसले, पंढरपुर कार्याध्यक्ष एम.एन.गायकवाड, सचिव नितीन आसबे, दिलीप साबळे, सुभाष तनमोर,मकरंद रणदिवे, सतिश रकटे, विलास भोसले, महादेव अनपट,अमर जाधव, बाळासाहेब बागल, अरूण फाळके, स्वागत कदम, शिवाजी गवळी,संदिप पवार, आदी उपस्थित होते. नागेश फाटे यांनी मराठा सेवा संघाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांचेही यावेळी भाषण झाले.
Team : aaplapandharpur.com

Recent Posts

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

3 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

6 days ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago

भाजपने पद्मशाली समाजासाठी काहीही केले नाही – प्रणिती शिंदे

'*पद्मशाली समाजाने दिला प्रणिती शिंदेंना जाहीर पाठिंबा' भाजपच्या दोन्ही खासदारांनी मागील १० वर्षात पद्मशाली समाजासाठी…

2 weeks ago