ताज्याघडामोडी

पंढरपुरात एकाच दिवशी ८ मटका एजंट ”फिगर” घेताना आढळले

सोमवार दिनांक १३ सप्टेंबर हा दिवस म्हणजे घरोघरी गौरी पूजनाचा दिवस.गौरी आगमन झाले कि अनेक कुटूंबातील कुटूंबकर्ते आजही तीन दिवस अनावश्यक रोखीचे आर्थिक व्यवहार थांबवत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पहावयास मिळते.

मात्र  आकस्मात धनलाभ होण्याची आशा बाळगून असलेले काही ”अभ्यासू” गुंतवणूकदार  सोमवार पासून नवीन लाईन सुरु होईल या आशेने शनिवार रविवार दोन दिवस घमासान अभ्यास करून फिगर काढत असतात.यातील तज्ञ् असलेल्या ”प्रोफेसर”मंडळींकडून यासाठी करण्यात येणारे बहुमोल मार्गदर्शन काही पेपरमध्ये शनिवार ‘ओपन चॅलेंज” म्हणून छापून येते.आणि आकस्मात धनलाभाच्या हिशोबाने गुंतवणूक करणाऱ्यांना म्हणे ते अतिशय मार्गदर्शनपर ठरते.

मात्र यंदाचा सोमवार अशा अनेक ”गुंतवणूकदारांसाठी” अनलकी ठरला असून नेमके याच दिवशी पंढरपुर शहर पोलिसांनी विविध ८ ठिकाणी कारवाई करत मटका एजंट मंडळींवर कारवाई केली आहे.त्यामुळे सणासुदीच्या दिवसात गुंतवणुकीच्या ८० पट अधिक नफा मिळविण्याचे अनेक ”गुंतवणूकदारांचे” मनसुबे धुळीस मिळाले आहेत.

काही वर्षांपूर्वी पंढरपुर शहरात जवळपास प्रत्येक गल्लीच्या कोपऱ्यात एक असे खोके असायचे ज्या ठिकाणी विक्रीला काहीच नसताना देखील गिऱ्हाईकांची प्रचंड गर्दी दिसून यायची.मग १९९५ साली राज्यात युती सरकार सत्तेत आले आणि स्व.गोपीनाथ मुंढे गृहमंत्री झाले.तेव्हा ५ वर्षे या राज्यात अशा कुठलाही माल विक्रीस नसलेल्या खोक्यांना टाळे लागल्याचे दिसून आले.पुढे राज्यात आघाडी सरकार आले आणि अशा गुंतवणूकदाराची कुचंबणा काही प्रमाणात थांबली.पण पुढे व्हाट्स अप आणि गुगल पे युग आले आणि ना अशा खोक्यांची आवश्यकता राहिली ना कागदाच्या वापराची(या मुळे कागदाचा वापर कमी झाल्याने पर्यावरणाचा ऱ्हास थांबला).

परंतु तरीही अडाणी,अशिक्षित लोक या भाग्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या खेळापासून वंचित राहू नयेत म्हणून अशा किरकोळ ”इन्व्हेस्टर” साठी काही मोजकीच ठिकाणे उपलब्ध होती.मात्र हा सारा प्रकार हा महाराष्ट्र जुगार अक्ट कलम 12 (अ) नुसार गुन्हा आहे हे लक्षात घेत पंढरपूर शहर पोलिसांनी सोमवार दिनांक १३ सप्टेंबर रोजी कारवाई केली असल्याचे दिसून येते.जुलै महिन्यात पंढरपूर तालुका पोलिसांनी अशीच धडक कारवाई केली होती त्यावेळी पंढरपूर नगर पालिकेच्या राजकारणात मोठे पद भूषविलेल्या एका माजी पदाधिकाऱ्याचे नावही पुढे आले होते .मात्र पुढे या बाबत काय झाले याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

2 days ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

5 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

2 weeks ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago