ताज्याघडामोडी

राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य (कै.) राजुबापु पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पंढरीत विविध सामाजिक उपक्रम संपन्न

राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य (कै.) राजुबापु पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त पंढरीत विविध सामाजिक उपक्रम संपन्न

पंढरपूर (प्रतिनिधी): राष्ट्रवादीचे प्रांतीक सदस्य (कै.) राजुबापु पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रम येथे मिष्ठान्न भोजन, अक्षत बंगलोज, मलपे वडा, इसबावी परिसरात वृक्षारोपण, इंदिरा कुष्ठरुग्ण वसाहत, गोपाळपूर रोड येथे चादर वाटप आदी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

श्रीविठ्ठल हॉस्पिटल येथे (कै.) राजुबापु पाटील यांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. डॉ. गिरीष बोरावके व अ‍ॅड. तानाजी सरदार यांच्या हस्ते प्रतिमापुजन करण्यात आले. यावेळी विठ्ठल साखर कारखान्याचे संचालक युवराजदादा पाटील, राष्ट्रवादीचे माजी विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, समाजसेवक संतोष नेहतराव, पंढरपूर नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, पत्रकार नवनाथ पोरे, शिवसेना जिल्हा नियोजन सदस्य महेशनाना साठे, राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पवार, समाजसेवक संजयअप्पा भिंगे, राष्ट्रवादी चे तालुका कार्याध्यक्ष प्रविणबाबा भोसले (सरकोली), राष्ट्रवादी युवकचे सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष बापु शिंदे, राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष स्वप्नील जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

गोपाळपूर येथील मातोश्री वृध्दाश्रमातील वयोवृध्दांना मिष्ठान्न भोजन देण्यात आले. यावेळी पांडुरंग साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन वसंतनाना देशमुख, प्रसिध्द भारुडसम्राज्ञी चंदाताई तिवाडी, जि.प. सदस्य अतुल लाला खरात, माजी नगरसेवक किरणराज घाडगे, राष्ट्रवादीचे पंढरपूर शहर कार्याध्यक्ष रणजित पाटील, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष कृष्णात माळी, यशवंतभाऊ पाटील पतसंस्थेचे व्यवस्थापक दिलीप पवार, राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा साधनाताई राऊत, किसान सेलचे जिल्हाध्यक्ष शुभांगी जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

इसबावी परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख, समाजसेवक सागरदादा यादव, माजी नगरसेवक धनंजय कोताळकर, पत्रकार शिवाजीराव शिंदे, शिवसेना तालुका संघटक संदीपभैया केंदळे, माजी नगरसेवक बालाजी मलपे, मारापुर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच प्रथमेश (भैया) पाटील, अ‍ॅड. शाम पवार, भिमराव काटवटे, अभिषेक पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

गोपाळपूर रोड येथील इंदिरा कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये चादर वाटप करण्यात आले. यावेळी सत्संग आश्रम चिंचगाव टेकडी चे उत्तम महाराज बोरीवार, मर्चंट बँकेचे माजी चेअरमन भारत भिंगे, माजी नगराध्यक्ष संजय घोडके, माजी नगरसेवक महंमद उस्ताद, समाजसेवक गणेश अंकुशराव, मेंढापूर ग्रामपंचायतीचे सरपंच दिलीप कोरके, काँग्रेसचे जेष्ठ नेते पैलवान द.बडवे, मंगेश जाधव, राष्ट्रवादी युवकचे शहर उपाध्यक्ष यश महिंगडे, पैलवान विश्‍वजीत व्यवहारे आदी मान्यवर उपस्थित होते.
हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी युवकचे सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष बापु शिंदे व राष्ट्रवादी युवकचे शहराध्यक्ष स्वप्नील जगताप यांनी विशेष प्रयत्न केले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

2 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

5 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago