ताज्याघडामोडी

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा

सांगोला: फॅबटेक एज्युकेशन सोसायटी पुणे संचलित,फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये 5 सप्टेंबर रोजी  शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृती प्रित्यर्थ सन्मान करण्यासाठी आणि आपल्या जीवनात शिक्षकांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी शिक्षक दिन साजरा केला जातो. यावेळी  प्राचार्य  सिकंदर पाटील, वनिता बाबर, शितल बिडवे यांच्या हस्ते सरस्वती पूजन  व श्री. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 4 सप्टेंबर या दिवशी

 विद्यार्थ्यांनी शिक्षकांचे वर्गावरील तास घेऊन शिक्षकांबद्दल आपला आदर व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. रिया कुमठेकर व कु. सुप्रिया पवार या दोघींनी सूत्रसंचालन केले तर कु. प्राप्ती आलदर व शुभम लाडे यांनी शिक्षक दिनाविषयी

 मनोगत व्यक्त केले,तर पवार सुप्रिया व प्राप्ती आलदर यांनी शिक्षकांसाठी  क्विझ कॉम्पिटिशन व जादूई प्रयोग घेतले. 

  आठवीतील विद्यार्थिनी कु. पूर्वा दौंडे हिने आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी श्री. पंचाक्षरी स्वामी श्री. समाधान खांडेकर, मिस.  वनिता बाबर,मिस. शितल बिडवे  यांचे विशेष सहकार्य लाभले. शिक्षक दिनानिमित्त संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर  मा.श्री. भाऊसाहेब रुपनर यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. तसेच संचालक प्रा. अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रूपनर, संचालिका सौ. सारिका रुपनर, कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनीही शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

13 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago