ताज्याघडामोडी

फॅबटेक कॉलेजच्या डी.फार्म प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के

महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या  परीक्षेत फॅबटेक कॉलेजच्या डी. फार्मसीच्या प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १०० टक्के लागला  असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी दिली.  फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये शै.वर्ष  २०१९-२० पासून नव्याने सुरु करण्यात आलेल्या डी.फार्म व बी.फार्म या विद्या शाखेच्या विद्यार्थ्यांनी  यशस्वी निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवली आहे. या निकालामध्ये प्रथम वर्ष  कु.यळसंगी मीनाक्षी ही विद्यार्थिनी ८१.५५ %  गुणांसह प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. कु.धनश्री जाधव ८१.०० %  गुणांसह द्वितीय  क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.तर कु. सुप्रिया काशीद ८०.६४ % गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्णझाली आहे. द्वितीय वर्ष निकालामध्ये सचिन हट्टाळी ८९.५० %  प्रथम  क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे.  कु.रेश्मा शिंदे  ८९.४० %  गुणांसह द्वितीय  क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. तर कु.निकिता  होटगी ८८.०० % गुणांसह तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर मा. श्री.भाऊसाहेब रुपनर, संचालक प्रा.अमित रुपनर, संचालक श्री. दिनेश रुपनर,कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे  यांनी अभिनंदन केले. मा. श्री. भाऊसाहेब रुपनर यांच्या मार्गदर्शनाखाली व कॅम्पस डायरेक्टर श्री. संजय अदाटे यांनी विद्यार्थ्यांसाठी  ऑनलाईन प्लॅटफॉर्म व इतर सोयी-

सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे सर्व प्राध्यापकांनी ऑनलाईन लेक्चरर्स तसेच प्रॅक्टिकलचे  व्हिडिओज बनवून विद्यार्थ्यांना त्यांच्या लॉगिन आयडीवर उपलब्ध करून देण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल समजण्यास सोपे गेले आहे. तसेच ग्रंथालयाच्या माध्यमातून आठवड्यातून दोन दिवस विद्यार्थ्यांना पुस्तके पुरवण्यात आली. याबरोबरच पीडीएफ स्वरूपात जर्नल्स व पुस्तके देखील त्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांनी सांगितले.

 महाविद्यालयास पीसीआयची अंतिम मान्यता  नुकतीच मिळाली आहे. हि मान्यता भेटल्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मसी स्टोअर करीता नोंदणी करता येते व सरकारी नोकरी मिळण्यास ते पात्र होतात. यामुळे नवीन प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल विशेषतःजिल्हा व जिल्ह्याबाहेरून हा फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी कडे आहे. विद्यार्थ्यांच्या या यशात प्रा. सर्फराज काझी, प्रा. सूरज कांबळे, प्रा.सुरज मणेरी, प्रा.मिस. प्रियांका कारंडे, प्रा. मिस अश्विनी झाडे, प्रा.मिस.मोना तांबोळी, प्रा. मिस. गोपिका डोंगरे  यांचे मार्गदर्शन लाभले.

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

शरद पवार यांनी विधानसभेची उमेदवारी जाहीर करूनही चेअरमन अभिजित पाटील यांचे बंड

विठ्ठल परिवारात 'इतिहासाची' चौथ्यांदा पुनरावृत्ती ?  राजकरणाच्या साठमारीत 'विठ्ठल वाचला पाहिजे' हीच जुन्या जाणत्या सभासदांची…

15 hours ago

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

4 days ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

1 week ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

2 weeks ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago