ताज्याघडामोडी

राज्यात 90 टक्के शाळांत नियमांना डावलून फी वसुली, शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांचं मोठं विधान

कोरोना महामारी तसेच ऑनलाईन तासिका यामुळे शाळांकडून आकारल्या जाणाऱ्या शिक्षण शुल्काचा मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आहे. शिक्षणसंस्थांनी शिक्षण शू्ल्क कमी करावे अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून नागरिकांकडून केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठं वक्तव्यं केलं आहे. राज्यात 90 टक्के शाळा या पालक समितीकडून मान्यता न घेता फी वसुली बेकायदेशीर पद्धतनीने फीची वसुली करत आहेत, असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. 

पालक समितीककडून मान्यता न घेता फी वसुली

बच्चू कडू अमरावतीमध्ये माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी शालेय शिक्षण शुल्काच्या मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं. “सध्या पालकांकडून बरीच बेकायदेशीर फी वसुली केली जाते. राज्यात 90 टक्के शाळा या पालक समितीकडून मान्यता न घेता फी वसुली करतात. सगळीकडे बेकायदेशीर फी वसुली सुरु आहे. कोणतीही शाळा नियमांचं पालन करत नाही. नागपूर आणि इतर ठिकाणी 18 शाळांनी पालकांकडून 8 ते 15 कोटी रुपये जास्तीचे वसूल केले होते. हे पैसे परत करण्याचा आदेश राज्य सरकारने दिला होता. मात्र त्या निर्णयाला न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. खरं तर कोर्टाने जो निर्णय दिला तो योग्य नाही,” असे बच्चू कडू म्हणाले.

15 टक्के शुल्क कपातीचा निर्णय, मात्र उच्च न्यायालयात आव्हान

दरम्यान, इयत्ता 12 वी पर्यंतच्या सर्व मंडळाच्या खासगी शैक्षणिक संस्थांमध्ये यंदाच्या वर्षासाठी 15 टक्के शुल्क कपात देण्याचा कायदा (अध्यादेश) मंत्रिमंडळाने फेटाळून लावला होता. मात्र, त्यानंतर शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री वर्षा गायकवाड यांनी पाठपूरावा करुन आश्वासनपूर्ती करण्यासाठी 12 ऑगस्ट रोजी फी कपातीबाबचा शासन निर्णय (जीआर) जारी केला होता. मात्र, सराकरच्या या निर्णयाला असोशिएशन ऑफ इंडियन स्कूलने उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे. 28 ऑगस्ट रोजी ही याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनंतर न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश दिले होते.

अकरावी प्रवेशाच्या शुल्कात 15 टक्के कपात

शिक्षण विभागाने इयत्ता अकरावीच्या प्रवेश शुल्काबाबत महत्त्वाचा निर्णय घेतलाय. यानुसार आगामी अकरावी प्रवेशाच्या शुल्कात 15 टक्के कपात करण्यात येणार आहे. 15 टक्के प्रवेश शुल्क सवलतीबाबत शिक्षण विभागाकडूनच निर्णय जाहीर करण्यात आलाय. या निर्णयानुसार अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील अनुदानित आणि विनाअनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांच्या शुल्कात विद्यार्थ्यांना ही सूट मिळणार आहे. या प्रवेश शुल्कातील कपातीमुळे विद्यार्थी-पालकांना दिलासा मिळालाय.

 

Team : aaplapandharpur.com

Recent Posts

आ.बबनदादा शिंदे समर्थकांच्या ”स्वाभिमानाच्या” लढाईत भाजली जाणार खा.निंबाळकरांची पोळी ?

माढा लोकसभा निवडणुकीत माढा विधानसभा मतदार संघातील आ.बबनदादा शिंदे समर्थक बजावणार निर्णायक भुमीका  माढा लोकसभा…

17 hours ago

भूमिपुत्रांना गावातच काम देण्यासाठी कटिबद्ध राहू !

तिऱ्हे येथील प्रचार सभेत आ.राम सातपुते यांची ग्वाही माझा मतदारसंघ हा माझा परिवार आहे. परिवारातल्या…

4 days ago

काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजींचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतले आशीर्वाद

लोकसभा निवडणुकीत भाजपाला विजयासाठी महास्वामीजींकडून आशिर्वाद राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री तथा…

1 week ago

सोलापुरात जिल्ह्यातील वीरशैव लिंगायत समाजाची बैठक संपन्न

राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा संकल्प लोकसभा निवडणुकीत राष्ट्रहिताच्या मुद्द्यावर १०० टक्के मतदान करण्याचा…

1 week ago

काँग्रेसने त्यांच्या कार्यकाळात कायम जातीपातीचे राजकारण केले-आ.सुभाष देशमुख

आ.राम सातपुते यांच्या विजयासाठी दक्षिण सोलापूर तालुक्यात झंझावाती गावभेट दौरे  मोदींच्या हाती पुन्हा देशाची सत्ता…

2 weeks ago

पंढरपुरात प्रणिती शिंदे यांची ‘मास्टर ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट’ हिम्मत आसबे यांच्या निवासस्थानी भेट

सोलापूर लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील समर्थकांची भूमिका ठरणार प्रभावशाली  मागील काही महिन्यात राज्यात  भाजप  ४५…

2 weeks ago